एका ओव्हरने हिरो ठरलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाच्या खेळाडूने निवृत्तीचा निर्णय घेतलाय. खेळाडूने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसलाय.
मुंबई : श्रीलंका आणि न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यात टेस्ट आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या कसोटी मालिकेची सुरुवात 9 फेब्रुवारीपासून होणार आहे. या मालिकेच्या दृष्टीने टीम इंडियाने जोरदार सरावाला सुरुपात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या खेळाडूने मोठा निर्णय घेतला आहे. स्टार खेळाडूने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीच्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2007 जिंकला होता. या विजयाचा हिरो हा शेवटची ओव्हर टाकणारा जोगिंदर शर्माने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यानंतर जोगिंदर क्रिकेटपासून कायमचा दूरच राहिला. त्यानंतर अखेर आज जोगिंदरने निवृत्तीचा निर्णय घेतला.
छोट्या कारकीर्दीत प्रसिद्धी
जोगिंदरचं क्रिकेट करिअर फार औटघटकेचं ठरलं. मात्र या छोट्या कारकीर्दीत जोगिंदरला खूप प्रसिद्धी मिळाली. टी 20 वर्ल्ड कप 2007 या स्पर्धेत जोगिंदर हिरो ठरला आणि घराघरात पोहचला. जोगिंदरने 4 टी 20 आणि तेवढ्या वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. या व्यतिरिक्त त्याने 16 आयपीएल सामनेही खेळले. जोगिंदर आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळला होता.
वर्ल्ड कप फायनलची शेवटची ओव्हर
टी 20 वर्ल्ड कप 2007 च्या फायनलमध्ये 2 चीर प्रतिद्वंदी आमनेसामने होते. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हा अंतिम सामना होता. टीम इंडियाने पहिले बॅटिंग करताना 157 धावा केल्या. आता पाकिस्तानला पहिलाच टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 158 धावांचं लक्ष्य होतं.
सामना रंगतदार झाला होता. पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये अवघ्या 13 धावांची गरज होती. पाकिस्तानकडून मैदानात कॅप्टन मिस्बाह उल हक होता. निर्णायक क्षणी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने अनुभवी गोलंदाजांना बॉलिंग न देता नवख्या जोगिंदरला ओव्हर दिली.
त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये जोगिंदर शर्मा माहित झाला. तर दुसऱ्या बाजूला धोनीने नवख्या गोलंदाजाला इतक्या महत्त्वाच्या सामन्यात निर्णायक ओव्हर का दिली म्हणून टीकाही करण्यात आली. मात्र धोनीचा विश्वास जोगिंदरने खरा ठरवला. जोगिंदरने सेट मिस्बाल उल हकचा काटा काढला अर्थात त्याला आऊट केलं.