आयसीसी वू्मन्स टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने पूर्ण झाले आहेत.त्यानंतर आता एकूण 10 संघांपैकी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे या 4 संघात वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात ए ग्रुपमधील ऑस्ट्रेलिया तर बी ग्रुपमधून दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात जिंकून कोणती टीम अंतिम फेरीत पोहचते? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे आपण जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल मॅच गुरुवारी 17 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल मॅच दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल मॅचला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेमी फायनल मॅच मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम : एलिसा हीली (कॅप्टन), ताहलिया मॅक्ग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, एश्ले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हॅरीस, एलाना किंग, फोबे लीचफील्ड, सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, एनाबेल सदरलँड, तायला व्लामिनक आणि जॉर्जिया वेयरहॅम.
साउथ अफ्रीका वूमन्स टीम : लॉरा वोल्वार्ड्ट (कॅप्टनन), एनेके बॉश, ताजमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, एनेरी डर्कसन, मिके डी रिडर, अयांदा ह्लुबी, सिनालो जाफ्टा, मारिजान कॅप, अयाबोंगा खाका, सुने लुस, नॉनकुलुलेको म्लाबा, सेशनी नायडू, तुमी सेखुखुने आणि क्लो ट्रायोन.