IND vs BAN Toss: टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, विराट कोहली ‘आऊट’

India vs Bangladesh Warm Up Match Toss: टीम इंडियाने एकमेव सराव सामन्यात बांगलादेश विरुद्ध टॉस जिंकला आहे. विराट कोहली या सराव सामन्यात खेळणार नाहीय.

IND vs BAN Toss: टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, विराट कोहली 'आऊट'
ind vs ban toss warm up match Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 8:00 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होत आहे. त्याआधी वर्ल्ड कप स्पर्धेच्या पूर्वसंध्येला सराव सामन्यातील अखेरच्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. तर नजमुल हुसेन शांतो बांगलादेशची कॅप्टन्सी करणार आहे. सामन्याचं आयोजन हे न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे करण्यात आलं आहे.  या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन रोहित शर्मा याने एका क्षणाचाही विचार न करता बॅटिंगचा निर्णय घेतला.

विराट कोहली ‘आऊट’

बांगलादेश विरुद्धच्या या सराव सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली खेळणार नाही. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस दरम्यान रोहित खेळणार नसल्याचं म्हटलं. विराट अमेरिकेत 31 मे रोजी अमेरिकेत पोहचल्याने बांगलादेश विरुद्ध खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना विराट कोहलीला मैदानात पाहण्यासाठी 5 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा आयर्लंड विरुद्ध 5 जून रोजी खेळणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 13 टी 20 सामन्यांमध्ये आमनासामना झाला आहे. यामध्ये टीम इंडिया वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर बांगलादेशला एकदा विजयी होण्यात यश आलंय.

टीम इंडियाने टॉस जिंकला

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), जाकेर अली (विकेटकीपर), लिटॉन दास, सौम्य सरकार, तॉहीद हृदोय, शाकिब अल हसन, महमुदुल्ला, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तन्झिद हसन, तन्झिम हसन साकी आणि तन्वीर इस्लाम.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.