Ashes Series मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर मोठा उलटफेर, विराट कोहली याला मोठा झटका
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर अॅशेस मालिकेतील रंगतदार झालेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. या विजयानंतर विराट कोहली याला मोठा झटका लागलाय.
मुंबई | अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 281 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने हे आव्हान 8 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. उस्मान ख्वाजा याने ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. ख्वाजाने 65 धावांची खेळी केली. तर शेवटी पॅट कमिन्स आणि नेथन लायन या दोघांनी चिवट खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजयी केलं. कॅप्टन पॅटने नाबाद 44 आणि लायनने 16 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा तर इंग्लंडकडून जो रुट याने शतक ठोकलं. या सामन्याच्या निकालानंतर आयसीसीने टेस्ट बॅट्समन रँकिंग जाहीर केलीय. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना विजयानंतर चांगलाच फटका बसलाय. तर जो रुट याला झालाय. तर दुसऱ्या बाजूला विराट कोहली याला नुकसान झालंय.
जो रुट अव्वल स्थानी
रुटने पहिल्या डावात 118 धावांची खेळी केली. या खेळीचा रुटला चांगला फायदा झाला. रुटला रँकिगमध्ये 5 स्थानांचा फायदा झालाय. रुटने थेट सहाव्या क्रमांकावरुन पहिल्या स्थानी आलाय. रुटने दिग्ग्जांना मागे टाकत पहिला नंबर पटकावलाय. रुटच्या नावावर 887 रेटिंग पॉइंट्स आहेत.
जो रुट टेस्टमध्ये ‘बेस्ट’
Joe Root becomes the new number 1 ranked Test batter in the World.
The best ever from England. pic.twitter.com/Tx6Jf5gNOe
— Johns. (@CricCrazyJohns) June 21, 2023
तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर शतकवीर स्टीव्हन स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड या दोघांनी मोठी झेप घेतली होती. मात्र आता इंग्लंड विरुद्धच्या विजयानंतरही या दोघांना झटका लागलाय. मार्नस लाबुशेन याला 2 स्थानांचं नुकसान झालंय. त्यामुळे मार्नल लाबुशेन पहिल्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी घसरलाय.
तर ट्रेव्हिस हेड याची तिसऱ्यावरुन चौथ्या स्थानी घसरण झालीय. तर स्टीव्ह स्मिथ थेट दुसऱ्या क्रमांकावरुन थेट सहाव्या स्थानी आलाय. ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक भूमिका बजावणारा उस्मान ख्वाजा नवव्या क्रमांकावरुन 2 स्थानांची झेप घेत 7 व्या स्थानी विराजमान झालाय. केन विलियमन्सन चौथ्यावरुन दुसऱ्या क्रमांकावर आलाय.
विराट कोहलीला झटका
या रँकिंगमध्ये विराट कोहली याला मोठा झटका लागलाय. विराटची 13 वरुन 14 व्या स्थानी घसरण झालीय. विराटच्या नावावर 700 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. ऋषभ पंत या फलंदाजांच्या यादीत पहिल्या दहात असलेला एकमेव भारतीय आहे. पंत दहाव्या स्थानी आहे.