मुंबई : टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. आयसीसीने 15 फेब्रुवारीला दुपारी कसोटी रँकिग जाहीर केलं. यामध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पछाडत नंबर 1 ठरली. टीम इंडिया नंबर 1 ठकल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र हा आनंद अवघ्या काही तांसांचाच ठरला. आयसीसीने संध्याकाळी पुन्हा रँकिग अपडेट केलं. यामध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे, तर अव्वलस्थानी ऑस्ट्रेलियाच आहे. आयसीसीने असं नक्की का केलं, त्याबाबतचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. मात्र टीम इंडियाच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
आयसीसीने दुपारी जारी केलेल्या रँकिंगनुसार, टीम इंडिया 115 रेटिंग्स पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर पोहचली होती. मात्र संध्याकाळ होताच आयसीसीने पुन्हा रँकिंग जारी केली. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया 126 पॉइंट्ससह पुन्हा नंबर 1 ठरली आहे. तर टीम इंडिया 115 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आयसीसीकडून दर बुधवारी रँकिग जाहीर केली जाते. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 132 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर आयसीसीने रँकिग जारी केलं अन् टीम इंडियाला नंबर 1 सांगण्यात आलं. त्यामुळे चाहते आनंदी झाले.
मात्र संध्याकाळ होताच आयसीसीने रँकिगमध्ये बदल केला. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला. यामध्ये टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आली.
आयसीसीने संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी रँकिंगमध्ये बदल केला. त्यानुसार आता ऑस्ट्रेलिया 1 नंबर आहे. तर याआधी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी आयसीसीने रँकिंग जारी केली होती.
दरम्यान आयसीसीने रँकिगमध्ये बदल करण्याची ही काही पहिली वेळ नाही. आयसीसीने काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे रँकिंगमध्ये बदल केला होता. आयसीसीने तेव्हाही आधी टीम इंडियाला 1 नंबर दाखवलं होतं. मात्र आयसीसीने पुन्हा टीम इंडियाला दुसऱ्या स्थानावर आणून ठेवलं होतं.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा 17-21 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुहमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल , कुलदीप यादव , रवींद्र जडेजा , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज आणि उमेश यादव.
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.