ICC Test Ranking | आयसीसीकडून कॅप्टन रोहित शर्माला धक्का, विराटला गूड न्यूज
Icc Test Ranking | आयसीसीने रँकिंग जाहीर केली आहे. आयसीसीने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. या रँकिगमध्ये रोहित शर्माला मोठा झटका लागला आहे. तर विराटला चांगला फायदा झाला आहे.
मुंबई | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात दुसरा कसोटी सामना हा न्यूलँड्स केपटाऊन येथे खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी करा या मरा असा सामना आहे. टीम इंडियाने नववर्षातील या पहिल्या सामन्यात जोरदार सुरुवात केली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 55 धावांवर गुंडाळलं. या दरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्यासाठी वाईट आणि विराट कोहली साठी गोड बातमी समोर आली आहे.
आयसीसी टेस्ट रँकिग जाहीर केली आहे. बॅट्समन रँकिगमध्ये विराट कोहली याची टॉप 10 मध्ये 2 वर्षानंतंर एन्ट्री झाली आहे. विराट कोहली नवव्या स्थानी पोहचला आहे. विराटला 4 स्थानांचा फायदा झाला आहे. विराटच्या नावावर 761 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. विराटला दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या कसोटीत केलेल्या कामगिरीचा फायदा हा रँकिंगमध्ये झाला आहे. रोहितने पहिल्या डावात 38 आणि दुसऱ्या डावात 76 धावा केल्या होत्या. तर रोहित शर्माला रँकिंगमध्ये फटका बसला आहे.
रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत फ्लॉप ठरला होता. त्यामुळे रोहितला रँकिगमध्ये तोटा सहन करावा लागला आहे. रोहितची 4 स्थानाने घसरण झाली आहे. त्यामुळे रोहित थेट 10 व्या वरुन 14 व्या स्थानी पोहचला आहे. रोहितच्या नावावर 719 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर 12 व्या स्थानी ऋषभ पंत आहे. पंत गेल्या वर्षापासून टीममधून बाहेर आहे. यावरुन पंतने अपघाताआधी काय प्रकारे बॅटिंग केलीय याचा अंदाज बांधता येईल.
विराटची टॉप 10 मध्ये एन्ट्री
Virat Kohli surges into top 10 in the @MRFWorldwide ICC Men’s Test Batters Rankings after runs in Boxing Day match 💪
Details 👇https://t.co/tQK3cAwG5z
— ICC (@ICC) January 3, 2024
वनडेत विराट तिसऱ्या स्थानी
दरम्यान विराट कोहली टीम इंडियाचा एकमेव फलंदाज आहे, जो वनडे आणि टेस्टमध्ये टॉप 10 फलंदाजांमध्ये आहे. विराट वनडे रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचे वनडे रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये 3 फलंदाज आहेत. शुबमन गिल दुसऱ्या आणि कॅप्टन रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानी कायम आहे.