टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया जेतेपदापासून दोन पावलं दूर, उपांत्य फेरीचा सामना 31 जानेवारीला या संघाशी
आयसीसी अंडर 19 वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 31 जानेवारीला होणार आहे. या सामन्यातील विजेते संघ जेतेपदासाठी 2 फेब्रुवारीला भिडणार आहेत. चला जाणून घेऊयात सर्व माहिती
![टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया जेतेपदापासून दोन पावलं दूर, उपांत्य फेरीचा सामना 31 जानेवारीला या संघाशी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया जेतेपदापासून दोन पावलं दूर, उपांत्य फेरीचा सामना 31 जानेवारीला या संघाशी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Under_19_Women.jpg?w=1280)
आयसीसी वुमन्स अंडर 19 टी20 वर्ल्डकप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. सुपर सिक्स फेरीचे सामने संपले असून चार संघाची उपांत्य फेरीत वर्णी लागली आहे. मलेशिायची राजधानी क्वालालंपूर येथे ही स्पर्धा होत आहे. उपांत्य फेरीचे सामना 31 जानेवारीला होणार आहेत.उपांत्य फेरीत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेने धडक मारली आहे. अंडर 19 भारतीय महिला संघाने मागच्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं. आता पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्याची संधी चालून आली आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भारताने अजूनपर्यंत या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. भारतीय महिला संघाने सुपर सिक्स फेरीतील शेवटच्या सामन्यात 150 धावांनी विजय मिळवला आणि उपांत्य फेरी गाठली. शुक्रवारी 31 जानेवारी रोजी भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजता सामना होणार आहे.
भारतासमोर इंग्लंडचं तगडं आव्हान असणार आहे. कारण इंग्लंडनेही या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. पण दोन् सामने पावसामुळे रद्द झाले होते. असं असताना भारत आणि इंग्लंड यांच्यातील रोमांचक सामना क्रीडाप्रेमींना पाहता येणार आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना 31 जानेवारीला होणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाला सुपर सिक्सच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेकडून पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. श्रीलंकेने 12 धावांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. पण या आधीच ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत जागा पक्की केली होती.
इंग्लंड आणि भारतीय संघाचे खेळाडू
भारताचा संघ : सानिका चाळके , निकी प्रसाद , गोंगडी त्रिशा (कर्णधार) , मिथिला विनोद , वैष्णवी शर्मा , जोशिता व्हीजे , जी कमलिनी , भाविका अहिरे, सोनम यादव , पारुनिका सिसोदिया , शबनम मो . शकील , आयुषी शुक्ला , धृती अनंद केशरी , आऊषी शुक्ला.
इंग्लंडचा संघ : फोबी ब्रेट , ऑलिव्हिया ब्रिन्सडेन , टिली कॉर्टीन-कोलमन , ट्रुडी जॉन्सन , केटी जोन्स , शार्लोट लॅम्बर्ट , अबी नॉरग्रोव्ह (कर्णधार) , इव्ह ओनील , डेविना सारा टी पेरिन , जेमिमा स्पेन्स , शार्लोट स्टब्स , अमू सुरेनकुमा , एरशा , प्रिशा , एरनकुमा थॉम्पसन.