टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 58 चेंडू निर्धाव! तरी सामना जिंकत रचला इतिहास, वाचा काय झालं ते
अंडर 19 वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नायजेरिया आणि आयर्लंड हे संघ आमनेसामने आले होते. खरं तर या स्पर्धेत या दोन्ही संघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र सुपर सिक्स फेरीच्या सामन्यात नायजेरियाने जबरदस्ता कामगिरी करत आयर्लंडला 6 धावांनी पराभूत केलं. नायजेरियाने फक्त 94 धावा जिंकण्यासाठी दिल्या होत्या.
![टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 58 चेंडू निर्धाव! तरी सामना जिंकत रचला इतिहास, वाचा काय झालं ते टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 58 चेंडू निर्धाव! तरी सामना जिंकत रचला इतिहास, वाचा काय झालं ते](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Nigeria_Won.jpg?w=1280)
अंडर 19 वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीचा सामने संपले आहे. या फेरीत क्रीडाप्रेमींना एक चांगला सामना पाहण्याची संधी मिळाली. नायजेरिया आणि आयर्लंड यांच्यात हा सामना रंगला होता. आयर्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात नायजेरियन संघाला 20 षटकात हवी तशी कामगिरी करता आली नाही. नायजेरियाने 20 षटकात 7 गडी गमवून 94 धावा केल्या आणि विजयासाठी 95 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात क्रिस्टेबलने सर्वाधिक 25 धााव केल्या. पण यासाठी तिला 42 चेंडूंचा सामना करावा. टी20 सारख्या जलद फॉर्मेटमध्ये इतक्या धीम्या गतीने खेळली. इतकंच काय तर एगुकुन आणि आगबोयाने प्रत्येकी 17-17 धावा केल्या. नायजेरियाने आपल्या डावात जवळपास 10 षटकं वाया घालवरी. आयर्लंडने 58 चेंडू निर्धाव टाकले. पण इतकं असून नायजेरियाने या स्पर्धेतील शेवट गोड केला. 94 धावांचं आव्हान असल्याने हा सामना आयर्लंड सहज जिंकेल असं वाटत होतं. मात्र तसं काही झालं नाही. नायजेरियाने हा सामना फक्त 6 धावांनी जिंकला.
94 धावांचा पाठलाग करण्यासाठी एलिस वॉल्श आणि फ्रेया सर्जंट ही जोडी मैदानात उतरली होती. पण एलिस वॉल्शला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर फ्रेया आणि रेबेक्का लोवेने 30 धावांची भागीदारी केली. पण फ्रेया 14 धावांवर बाद झाली. त्यानंतर घसरगुंडी सुरु झाली आणि एका पाठोपाठ एक खेळाडू बाद होत गेले. अवघ्या 14 धावांवर आयर्लंडचे 6 खेळाडू तंबूत परतले. फ्रेया 14, रेबेक्काने 21 आणि मिली स्पेन्सरने 14 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. आयर्लंडने 18.4 षटकात सर्व गडी गमवून 88 धावा केल्या. विजयासाठी 6 धावा कमी पडल्या आणि नायजेरियाने बाजी मारली.
Lilian Ude caps off Nigeria’s #U19WorldCup campaign in style with runs, wickets and the @aramco POTM award 🎖️ pic.twitter.com/65IOJwprB3
— T20 World Cup (@T20WorldCup) January 29, 2025
दोन्ही संघाचे खेळाडू
नायजेरिया महिला अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): पेकुलियर अग्बोया, लकी पीटी(कर्णधार), अदेशोला अडेकुन्ले, क्रिस्टाबेल चुकवुओनी, उसेन पीस, लिलियन उदेह, व्हिक्टरी इग्बिनेडियन, अनोंटेड अखिग्बे, डेबोरा बासी (विकेटकीपर), मुहिबत अमुसा, ओमोसा एग्युअकुन.
आयर्लंड महिला अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): ॲलिस वॉल्श, फ्रेया सार्जेंट, रेबेका लोवे, ॲनाबेल स्क्वायर्स, लारा मॅकब्राइड, ॲबी हॅरिसन (विकेटकीपर), मिली स्पेन्स, नियाम मॅकनल्टी (कर्णधार), एली मॅकगी, किया मॅककार्टनी, जेनिफर जॅक्सन.