AUSvsSA, T20 World Cup 2023 Final Live Streaming | फायनलबाबत एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
ऑस्ट्रेलिया टीम इंडियाला तर दक्षिण आफ्रिकाने इंग्लंडला पराभूत करत टी 20 वूमन्स वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
मुंबई | आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कपमधील अंतिम सामना हा रविवारी 26 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात ट्रॉफीसाठी गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका ट्रॉफीसाठी भिडणार आहे. ऑस्ट्रेलिया टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी टीम आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकूण 8 पैकी 5 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. तर फायनलमध्ये पोहचण्याची ऑस्ट्रेलियाची ही सातवी वेळ आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कस लागणार आहे.
पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया टीम इंडियाला पराभूत करत फायनलला पोहचली. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर विजय मिळवला. अशाप्रकारे 2 फायनल टीम निश्चित झाल्या. आता या दोन्ही टीम वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. या निमित्ताने सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
कुठे होणार सामना?
वर्ल्ड कपचा हा महामुकाबला केपटाऊनमधील न्यूलँड्समध्ये आयोजित करण्यात आला आहे.
सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
या सामन्याला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर सामन्याच्या अर्धा तासाआधी 6 वाजता टॉस होणार आहे.
टेलिकास्ट कुठे पाहता येणार?
या हायव्होल्टेज सामन्याचं टेलिकास्ट हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्क करण्यात येणार आहे. तसेच हॉटस्टारवरही लाईव्ह स्ट्रीमिंगा पाहता येईल.
अंपायर्स कोण असणार?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायरचा निर्णय अंतिम असतो. खेळाडू्ंना तो निर्णय मान्य नसेल, तर त्या निर्णयाला डीआरएस घेऊन आव्हान देता येतं. या वर्ल्ड कप फायनलच्या सामन्यात अंपायर्सची भूमिकाही तितकीच निर्णायक ठरणार आहे, जितकी खेळाडूंची कामगिरी. या सामन्यात जॅकलिन विलियम्स आणि किम कॉटन या दोघी फिल्ड अंपायर असणार आहेत. तर स्यू रेडफर्न थर्ड अंपायर असणार आहे. तसेच जीएस लक्ष्मी मॅच रेफरी असणार आहे.
इंग्लंड टीम | हीथर नाईट (कर्णधार), अलिस कॅप्से, डॅनी वॅट, मैया बाउचिर, सोफिया डुंकले, चार्ली डीन, डॅनियल गिब्सन, नॅट क्विअर, अमी जोन्स, लॉरेन विनफिल्ड हिल, फ्रेया डेविस, इस्सी वोंग, केट क्रॉस, कॅथरिन ब्रंट, लॉरेन बेल, सारा ग्लेन आणि सॉफि एक्सेलस्टोन.
टीम साऊथ आफ्रिका | सुने लूस (कॅप्टन), अन्नेरी डेर्कसन, लारा गुडाल, लॉरा व्होलवार्ट, अन्नेके बॉच, च्लोई ट्रायोन, डेलमारी टकर, मॅरिजेन कॅप्प, नदीन डि क्लर्क, सिनालो जाफ्ता, टाझमिन ब्रिट्स, अयाबोंगा खाका, मासबाटा क्लास, नोन्कुलुलेको म्लाबा आणि शबनिम इस्माईल.