मुंबई : आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने मोठा कारनामा केला आहे. हरमनप्रीतने आयर्लंड विरुद्ध हा वर्ल्ड रेकॉर्ड केला. आयर्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरताच हरमनप्रीतने हा पराक्रम केला. आयर्लंड विरुद्धची मॅच ही हरमनप्रीतच्या कारकीर्दीतील 150 वी मॅच ठरली. हरमनप्रीत यासह क्रिकेट विश्वात 150 सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. उल्लेखनीय आणि अभिमानास्पद बाब म्हणजे महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये हरमनप्रीत ही 150 टी 20 सामने खेळणारी पहिली क्रिकेटर ठरली आहे.
हरमनप्रीतनंतर सर्वाधिक टी 20 सामने खेळण्याचा विक्रम हा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने आपल्या करियरमध्ये 148 टी सामने खेळले आहेत.
हरमनप्रीत कौर हीचा वर्ल्ड रेकॉर्ड
? Milestone Alert ?
First woman cricketer to play 1⃣5⃣0⃣ T20Is ? ?
Congratulations to #TeamIndia captain @ImHarmanpreet on a special landmark ? ?#INDvIRE | #T20WorldCup pic.twitter.com/X1DyIqhlZI
— BCCI Women (@BCCIWomen) February 20, 2023
तर तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडच्या सुजी बेट्स आहे. सुजी आतापर्यंत 143 टी 20 सामने खेळली आहे. तर इंग्लंडची डॅनी व्याट हीच्या नावावर 141 टी 20 सामने खेळण्याचा अनुभव आहे.
दरम्यान हरमनप्रीतने आयर्लंड विरुद्ध आणखी कारनामा केला. हरमनप्रीतने टी 20 मध्ये 3 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.
दरम्यान टीम इंडियाने आयर्लंडला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. टीम इंडियाकडून स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 87 धावांची शानदार खेळी केली.
स्मृतीने 56 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांसह ही खेळी केली. स्मृतीचं शतक अवघ्या 13 धावांसाठी हुकलं. पण तिच्या या खेळीच्या जोरावर भारताला 150 पार मजल मारता आली.
स्मृतीव्यतिरिक्त सलामीवीर शफाली वर्मा हीने 24 तर जेमिमाह रॉड्रिग्जने 19 धावांचं योगदान दिलं.कर्णधार हरमनप्रीत 13 धावा करुन माघारी परतली. दीप्ती शर्मा आणि तर रिचा घोष या दोघीही भोपळा फोडण्यातही अपयशी ठरल्या. तर आयर्लंडकडून कर्णधार लॉरा डेलनी हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
आयर्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): एमी हंटर, गॅबी लुईस, ओरला प्रेंडरगास्ट, एमियर रिचर्डसन, लुईस लिटिल, लॉरा डेलेनी (कर्णधार), आर्लेन केली, मेरी वॉल्ड्रॉन (कीपर), लेआ पॉल, कारा मरे आणि जॉर्जिना डेम्पसी.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड आणि रेणुका ठाकूर सिंग.