AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सने विजय, सेमी फायनलमध्ये धडक! पाकिस्तानचा पत्ता कट!
Australia Women vs Pakistan Women Match Highlights In Marathi : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत सलग तिसरा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने यासह उपांत्य फेरीत धडक दिली आहे.
ऑस्ट्रेलिया वूमन्स क्रिकेट टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 14 व्या सामन्यात पाकिस्तानवर 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी मिळालेलं 83 धावांचं आव्हान हे 1 विकेट गमावून 11 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाचा हा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. तर पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान हे जवळपास संपुष्ठात आलं आहे.
ऑस्ट्रेलियाची विजयी हॅटट्रिक
ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन आणि विकेटकीपर एलिसा हिली हीने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. मात्र त्यानंतर एलिसाला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. बेथ मूनी हीने 15 धावांचं योगदान दिलं. तर एलिसा पेरी आणि ऍशलेग गार्डनर या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवलं. एलिसा पेरी हीने नाबाद 22 धावांचं योगदान दिलं. तर ऍशलेग गार्डनर 7 रन्सवर नॉट आऊट परतली. तर पाकिस्तानकडून सादिया इक्बाल हीने एकमेव विकेट घेतली.
पाकिस्तानची घसरगुंडी
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने गुडघे टेकले. पाकिस्तानला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानकडून फक्त चौघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. पाकिस्तानचा डाव हा अवघ्या 82 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून ऍशलेग गार्डनर हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सने विजय, सेमी फायनलमध्ये प्रवेश!
Australia claim a nine-wicket win in Dubai.#PAKWvAUSW | #T20WorldCup | #BackOurGirls pic.twitter.com/YqosMHjCye
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 11, 2024
पाकिस्तान वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : मुनीबा अली (कर्णधार आणि विकेटकीपर), सिद्रा अमीन, निदा दार, सदफ शमास, आलिया रियाझ, इरम जावेद, ओमामा सोहेल, तुबा हसन, नशरा संधू, सादिया इक्बाल आणि सय्यदा अरूब शाह.
ऑस्ट्रेलिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : एलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), बेथ मूनी, एलिस पेरी, ऍशलेग गार्डनर, फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वेअरहॅम, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट आणि टायला व्लामिंक.