वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 16 वा सामना बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होत आहे. तसं पाहिलं तर बांगलादेशचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण दक्षिण अफ्रिकेला शेवटच्या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. कारण वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या संघांचे प्रत्येकी 4 गुण आहेत. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीच्या दिशेने कूच करायची असेल तर हा सामना जिंकावाच लागणार आहे. दरम्यान बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने सांगितलं की, ‘आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. संघासाठी बाउन्स बॅक करण्याची ही उत्तम संधी आहे. आम्ही विजयाने सुरुवात केली, पण गती कायम ठेवू शकलो नाही. आज आमच्या संघात एक बदल आहे.” दरम्यान, दुबईची खेळपट्टी ही खेळपट्टी फिरकीपटूंना संपूर्णपणे मदत करेल.
दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हीने सांगितलं की, “आम्हाला गोलंदाजी मिळाल्याचा आनंद झाला, आम्ही या गेममध्ये द्विधा मनस्थितीतून आलो होतो. गटात अजून बरेच क्रिकेट खेळायचे बाकी आहे, आम्हाला फक्त विजय हवा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही आज ते करू शकतो. विश्वचषक प्रत्येक क्रिकेटरमधील सर्वोत्तम गोष्टी समोर आणतो आणि मला आनंद आहे की मी योगदान देऊ शकलो. आमच्या संघात कोणतेही बदल नाहीत .”
बांगलादेश महिला (प्लेइंग इलेव्हन): दिलारा अक्टर, शाठी राणी, शोभना मोस्तरी, निगार सुलताना (विकेटकीपर कर्णधार), मुर्शिदा खातून, शोर्ना अक्टर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खान, नाहिदा अक्टर, मारुफा अक्टर.
दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, मारिझान कॅप, सुने लुस, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका