IND vs AUS : टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया निर्णायक मॅच, सामना कधी आणि कुठे?
INDW Vs AUSW Live Streaming : टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2024 मोहिमेतील अखेरचा सामना खेळण्यासाठी तयार आहे.
आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना असणार आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर एलिसा हिलीकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची धुरा आहे. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहे. ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाने पराभवाने सुरुवात केल्यानंतर सलग 2 सामने जिंकले. त्यामुळे टीम इंडियासाठी सेमी फायनलच्या हिशोबाने हा सामना ‘आर या पार’ असा आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना रविवारी 13 ऑक्टोबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम : एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वेरेहॅम, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शट, टायला व्लेमिंक, डार्सी ब्राउन, अलाना किंग, ग्रेस हॅरीस आणि किम गर्थ.
वूमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सजीवन सजना, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग, यास्तिका भाटीया, दयालन हेमला, राधा यादव आणि पूजा वस्त्राकार.