ENG vs WI : विंडिजची सेमी फायनलमध्ये धडक, इंग्लंडचा 6 विकेट्सने धुव्वा

England Women vs West Indies Women Match Result : इंग्लंडने वेस्ट इंडिजला विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडिजने हे आव्हान सलामी जोडीच्या विस्फोटक फलंदाजीच्या मदतीने सहज पूर्ण केलं.

ENG vs WI : विंडिजची सेमी फायनलमध्ये धडक, इंग्लंडचा 6 विकेट्सने धुव्वा
Qiana JosephImage Credit source: Icc X account
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 11:36 PM

वेस्ट इंडिज वूमन्स टीमने इंग्लंडचा 6 विकेट्सने धुव्वा उडवत आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक मारली आहे. इंग्लंडने विंडिजला विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडिजने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 12 बॉल राखून पूर्ण केलं. विंडिजने 18 ओव्हरमध्ये 142 धावा केल्या. विंडिजसाठी सलामी जोडीने विस्फोटक बॅटिंग करत विजयाचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर इतर फलंदाजांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत संघाला विजयापर्यंत पोहचवलं. विंडिज सेमी फायनलमध्ये पोहचणारी चौथी आणि शेवटची टीम ठरली. बी ग्रुपमधून विंडिज आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर इंग्लंडचा या पराभवासह स्पर्धेतून बाजार उठला आहे.

विंडिजची बॅटिंग

विंडिजच्या सलामी जोडीने विजयाचा पाया रचला. कॅप्टन हेली मॅथ्यूज आणि कियाना जोसेफ या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. या दोघींनी 102 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कियाना जोसेफ हीने 38 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरच्या मदतीने 52 धावा केल्या. त्यानंतर 2 धावांनी विंडिजने दुसरी विकेट गमावली. कॅप्टन हेली मॅथ्यूज आऊट झाली. हेलीने 38 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. त्यानंतर इतर फलंदाजांनी उर्वरित धावा पूर्ण करुन विंडिजला विजयी केलं. शेमेन कॅम्पबेल हीने 5 धावा केल्या. डिआंड्रा डॉटिन हीने निर्णायक 27 धावांची खेळी केली. तर चिनेल हेन्री आणि आलिया ॲलेने ही जोडी नाबाद परतली. चिनेल हेन्री शून्यावर नाबाद परतली. तर आलिया हीने नाबाद 6 धावा केल्या.

विंडिजची विजयासह सेमी फायनलमध्ये धडक

इंग्लंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हीदर नाइट (कॅप्टन), माइया बाउचियर, डॅनिएल व्याट-हॉज, ॲलिस कॅप्सी, नॅट स्कायव्हर-ब्रंट, एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनियल गिब्सन, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन आणि लॉरेन बेल.

वेस्ट इंडिज वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हेली मॅथ्यूज (कॅप्टन), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, चेडियन नेशन, झैदा जेम्स, अश्मिनी मुनिसार, आलिया ॲलेने, एफी फ्लेचर आणि करिश्मा रामहरक

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर, कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर, कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?.
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली.
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'.
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा.
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या.
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा.
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत.
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ.
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ.