BAN vs WI : विंडिजच्या बाजूने नाणेफेकीचौ कौल, बांगलादेश विरुद्ध बॅटिंग की फिल्डिंग ?

Bangladesh Women vs West Indies Women Toss: बांग्लादेश आणि वेस्ट इंडिजड या दोन्ही संघांचा हा टी 20 वर्ल्ड कपमधील तिसरा सामना आहे. बांग्लादेशने नाणेफेक जिंकून चेसिंगचा निर्णय घेतला आहे.

BAN vs WI : विंडिजच्या बाजूने नाणेफेकीचौ कौल, बांगलादेश विरुद्ध बॅटिंग की फिल्डिंग ?
Bangladesh Women vs West Indies WomenImage Credit source: bangladesh cricket x account
Follow us
| Updated on: Oct 10, 2024 | 7:47 PM

आयसीसी वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 13 व्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. या सामन्याचं आयोजन हे शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस झाला. वेस्ट इंडिजच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. विंडिजने फिल्डिंगचा निर्णय घेत बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. बांगलादेशने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर विंडिजकडून मँडी मंगरू हीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

दोन्ही संघांसाठी निर्णायक सामना

वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी हा निर्णायक असा सामना आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेल्या 2 पैकी 1 सामना जिंकला आहे तर 1 गमावला आहे. तर बी ग्रुपमधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड प्रत्येकी 4-4 गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. त्यामुळे विंडिज आणि बांगलादेश या दोन्ही संघांना स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचं असेल, तर कोणत्याही परिस्थितीत या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी हा करो या मरो असाच सामना आहे. त्यामुळे उभयसंघात या सामन्यात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

विंडिजचा टॉसचा बॉस, बांगलादेशची बॅटिंग

वेस्ट इंडिज वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हेली मॅथ्यूज (कॅप्टन), स्टॅफनी टेलर, कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, आलिया ॲलेने, मँडी मंगरू, एफी फ्लेचर, अश्मिनी मुनिसार आणि करिश्मा रामहरक.

बांगलादेश वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), शथी राणी, दिलारा अक्टर, शोभना मोस्तरी, शोर्ना अक्टर, ताज नेहर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खान, नाहिदा अक्टर आणि मारुफा अक्टर.

उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा.
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन.
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी.
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी.
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?.
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....