आयसीसी वूमन्स टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील दहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 60 धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला विजयासाठी 149 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 19.2 ओव्हरमध्ये 88 धावांवर गुंडाळलं. ऑस्ट्रेलियाचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. तसेच न्यूझीलंडला या पराभव नेट रनरेटमध्ये मोठा झटका लागला आहे. न्यूझीलंडला मोठ्या फरकाने सामना गमवावा लागल्याने त्यांचा नेट रनरेट कमी झाला आहे. न्यूझीलंडचा हा टी 20I वर्ल्ड कप इतिहासातील धावांबाबत तिसरा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.
न्यूझीलंडकडून फक्त तिघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. न्यूझीलंडकडून अमेलिया केर हीने सर्वाधिक 29 धावा केल्या. सुझी बेट्सने 20 धावांचं योगदान दिलं. तर ली ताहुहू हीने 11 धावा केल्या. तर इतरांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूट आणि ॲनाबेल सदरलँड या दोघींनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. सोफी मोलिनक्स हीने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जॉर्जिया वेअरहॅम आणि ताहलिया मॅकग्रा या दोघींनी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 148 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या 4 फलंदाजांनीच सर्वाधिक धावा केल्या. मात्र त्यानंतर एकीलाही काही खास करता आलं नाही. ऑस्ट्रेलियासाठी बेथ मूनी हीने 40 धावांचं योगदान दिलं. एलिसा पेरी हीने 30 रन्स केल्या. कॅप्टन एलिसा हिली हीने 26 धावा जोडल्या. तर फोबी लिचफील्डने 18 धावांची भर घातली. तर इतरांना काही खास करता आलं नाही. न्यूझीलंडकडून अमेलिया केर हीने चौघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रोझमेरी मायर आणि ब्रुक हॅलिडे या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
कांगारुंचा सलग दुसरा विजय
A clinical performance from the Aussies as they go to top of Group A 👏#T20WorldCup | #AUSvNZ 📝: https://t.co/gWZ4Y3TnJ1 pic.twitter.com/H5vu7ezYk6
— T20 World Cup (@T20WorldCup) October 8, 2024
ऑस्ट्रेलिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, जॉर्जिया वेअरहॅम, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, ग्रेस हॅरिस, सोफी मोलिनक्स आणि मेगन शूट.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : सोफी डिव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (विकेटकीपर), रोझमेरी मायर, फ्रॅन जोनास, ली ताहुहू आणि ईडन कार्सन.