BAN vs ENG : इंग्लंडची विजयी सुरुवात, बांगलादेशवर 21 धावांनी मात, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप
Bangladesh Women vs England Women Highlights In Marathi: इंग्लंड वूमन्स क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवात विजयाने केली आहे. इंग्लंडने 21 धावांनी बांगलादेशवर मात केली.
आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात इंग्लंड क्रिकेट टीमने विजयी सुरुवात केली आहे. इंग्लंडने बांगलादेशवर 21 धावांनी मात करत विजयाचं खातं उघडलं. इंग्लंडच्या गोलंदाजांनी 118 शानदार बचाव करत बांगलादेशला 100 धावांच्या आतच रोखलं. इंग्लंडने बांगलादेशला विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 97 धावाच करता आल्या. इंग्लंडने या विजयासह बी ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये थेट पहिल्या स्थानी झेप घेतली. तर बांगलादेश 2 सामन्यांमधील 1 विजयासह तिसऱ्या स्थानी आहे.
बांगलादेशची बॅटिंग
बांगलादेशकडून सोभना मोस्तरी हीने सर्वाधिक धावा केल्या. सोभनाने 48 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह 44 रन्स केल्या. तर निगर सुल्ताना हीने 15 धावांचं योगदान दिलं. त्याव्यतिरिक्त एकीलाही दुहेरी आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशचे फलंदाज इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर निष्प्रभ ठरले. इंग्लंडकडून लिन्से स्मिथ आणि शार्लोट डीन या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर सारा ग्लेन आणि नॅट सायव्हर ब्रंट या दोघींना 1-1 विकेट मिळाली.
त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. इंग्लंडने 7 विकेट्स गमावून 118 धावा केल्या. इंग्लंडकडून फक्त तिघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर इतर फलंदाज अपयशी ठरले. डॅनिएल व्याट-हॉज हीने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर माइया बाउचियरने 23 रन्स् केल्या. तर एमी जोन्सने 12 धावांचं योगदान दिलं. बांगलादेशकडून नाहीदा अक्टर, फाहिमा खातुन आणि रितून मोनी या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर राबिया खानने 1 विकेट मिळवली.
इंग्लंडची विजयी सुरुवात
England begin their Women’s #T20World Cup journey with a thrilling first win ☺#ENGvBAN #WhateverItTakes pic.twitter.com/ycwbwd6XRx
— ICC (@ICC) October 5, 2024
बांगलादेश वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), शाठी राणी, दिलारा अक्टर, शोभना मोस्तरी, ताज नेहर, शोर्ना अक्टर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खान, नाहिदा अक्टर आणि मारुफा अक्टर
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : हीदर नाइट (कॅप्टन), माइया बाउचियर, डॅनिएल व्याट-हॉज, ॲलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनियल गिब्सन, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन आणि लिन्से स्मिथ.