SA vs NED | नेदरलँड्सचा मोठा उलटफेर, दक्षिण आफ्रिकावर 38 धावांनी विजय
South Africa vs Netherlands Icc World Cup 2023 | नेदरलँड्स क्रिकेट टीमने मोठा उलटफेर केला आहे. नेदरलँड्सने टी 20 वर्ल्ड कप 2022 नंतर आता वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका टीमवर विजय मिळवत इतिहास रचला आहे.
धर्मशाळा | अफगाणिस्ता क्रिकेट टीमनंतर नेदरलँड्सने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये उलटफेर केला आहे. नेदरलँड्से इतिहास रचला आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकावर 38 धावांनी विजय मिळवला आहे. हा सामना पावसामुळे 43 ओव्हरचा खेळवण्यात आला. त्यानुसार नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 246 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र नेदरलँड्ससमोर दक्षिण आफ्रिकेने गुडघे टेकले. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 42.5 ओव्हर्समध्ये 207 धावांवर ऑलआऊट केलं. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकावर टी 20 वर्ल्ड कप 2022 नंतर पहिल्यांदाच हा विजय मिळवला.
दक्षिण आफ्रिका टीमची बॅटिंग
दक्षिण आफ्रिकाकडून डेव्हिड मिलर याने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. हेनरिच क्लासेन 28 धावा करुन आऊट झाला. गेराल्ड कोएत्झी याने 22 आणि क्विंटन डी कॉक याने 20 धावा केल्या. कॅप्टन टेम्बा बावुमा याने 16 धावा केल्या. मार्को जान्सेन आणि कगिसो रबाडा या दोघांनी प्रत्येकी 9 धावा केल्या. रसी वेन डेर डुसेन याने 4 रन्स केल्या. तर एडन मारक्रम 1 धावा करुन माघारी परतला.
केशव महाराज याने अखेरपर्यंत लढाई दिली. मात्र त्याला टीमला विजयी करता आलं नाही. मात्र त्याने पराभवातील अंतर कमी केलं. महाराजने 40 धावेा केल्या. तर लुंगी एन्गिडी 7 धावांवर नाबाद राहिला. नेदरलँड्सकडून लोगन व्हॅन बीक याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर बास द लीडे, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे आणि पॉल व्हॅन मीकरेन या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कुलीन एकरमन याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
नेदरलँड्सची ऐतिहासिक कामगिरी
LVB takes wicket number 1️⃣0️⃣ and brings in the historic win🎊🎉
Kudos to the fight and resistance showed by the last wicket partnership of the opposition. 👏
Everyone giving their all is what makes this #CWC23 special.#SAvNED pic.twitter.com/gTih5VUMdN
— Cricket🏏Netherlands (@KNCBcricket) October 17, 2023
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि गेराल्ड कोएत्झी.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.