NZ vs AFG Toss | अफगाणिस्तानने टॉस जिंकला, न्यूझीलंडने कॅप्टन बदलला
New Zealand vs Afghanistan Toss Report | न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला आहे. पाहा दोन्ही टीमची प्लेईंग ईलेव्हन.
चेन्नई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील तिसरा टप्पा पार पडला आहे. या तिसऱ्या टप्प्यात क्रिकेट चाहत्यांना 2 मोठे उलटफेर पाहायला मिळाले. अफगाणिस्तानने वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडला धुल चारली. तर 17 ऑक्टोबरला नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकावर विजय मिळवला. आता 18 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप स्पर्धेतील निर्णायक आणि चौथ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या चौथ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने आहे. न्यूझीलंडने या वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत खेळेलेले तिन्ही सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्तान 3 पैकी 1 सामना जिंकलाय. मात्र उलटफेर केल्याने अफगाणिस्तानचा विश्वास चांगलाच वाढलेला आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला आहे. कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टॉम लॅथम न्यूझीलंडचं नेतृत्व करतोय. केन विलियमन्स याच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे टॉमकडे सर्व सूत्रं देण्यात आली आहेत. केनच्या जागी विल यंग याला संधी देण्यात आली आहे. तर अफगाणिस्तानने प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
आकडेवारी कुणाच्या बाजूने?
आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान एकूण 2 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. न्यूझीलंडच या दोन्ही सामन्यात सरस ठरली आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला दोन्ही सामन्यात पराभूत केलंय. त्यामुळे इतिहास न्यूझीलंडच्या बाजूने आहे. मात्र अफगाणिस्तानला इतिहास बदलण्याची आवड आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला गृहीत धरण्याची चूक न्यूझीलंड करणार नाही.
अफगाणिस्तान टॉसचा बॉस
🚨 NEWS FROM THE CENTER 🚨
Afghanistan skipper @Hashmat_50 has won the toss and decided that AfghanAtalan will bowl first. 👍#AfghanAtalan | #CWC23 | #AFGvNZ | #WarzaMaidanGata pic.twitter.com/nX36i82k4O
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 18, 2023
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.