ENG vs NZ | वर्ल्ड कप 2023 पहिल्या सामन्यात न्यूझीलंड टॉसचा बॉस, कॅप्टन बदलला
Icc World Cup 2023 England vs New Zealand Toss | इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचे मुख्य खेळाडू हे पहिल्या सामन्याला मुकणार आहेत. या खेळाडूंना दुखापतीमुळे सलामीच्या सामन्याला मुकावं लागलं आहे.
अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेता इंग्लंड विरुद्ध उपविजेता न्यूझीलंड आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी टॉस करण्यात आला. न्यूझीलंडने टॉस जिंकला आहे. कॅप्टन टॉम लॅथमने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांना जबर धक्के लागले आहेत. इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्स हा दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीये. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमन्सन हा उपलब्ध नाही. त्यामुळे टॉम लॅथम याला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दोन्ही प्लेईंग ईलेव्हनमधून मोठे खेळाडू ‘आऊट’
न्यूझीलंडकडून एकूण 4 खेळाडू हे प्लेईंग ईलेव्हनचा भाग नाहीत. यामध्ये केलन विलियमन्स, टीम साऊथी, लॉकी फर्ग्यूसन आणि ईश सोढी या चौघांचा समावेश आहे. तर बेन स्टोक्स यालाही मुकावं लागलं आहे. स्टोक्सने सराव केला होता. मात्र त्याला दुखापतीमुळे सलामीच्या सामन्यात खेळणं काही शक्य झालेलं नाही.
इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात वरचढ कोण?
गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड हे संघ एकदिवसीय क्रिकेट इतिहासात आतापर्यंत एकूण 95 वेळा एकमेकांसमोर भिडले आहेत. हे दोन्ही संघ तुल्यबल ठरले आहेत. न्यूझीलंडने 95 पैकी 44 वेळा विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने 45 वेळा बाजी मारली आहे. तर 4 सामने निकाली निघू शकले नाहीत. तर 2 मॅच या टाय राहिल्या.
वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात
4️⃣8️⃣ games 1️⃣0️⃣ teams 0️⃣1️⃣ trophy
The 2023 World Cup has officially started! 🏆 #EnglandCricket | #CWC23 pic.twitter.com/NU84FDpmO8
— England Cricket (@englandcricket) October 5, 2023
तसेच हे दोन्ही संघांनी वर्ल्ड कपमध्ये एकमेकांसमोर 10 मॅच खेळल्या आहेत. इथेही दोन्ही संघांनी बरोबरीचा हिशोब ठेवलाय. इंग्लंड आणि न्यूझीलंडने प्रत्येकी 5-5 मॅच जिंकल्या आहेत.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरान, ख्रिस वोक्स, आदिल रशीद आणि मार्क वुड.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री आणि ट्रेन्ट बोल्.