World Cup 2023 | उपकर्णधारानंतर आता कॅप्टन सामन्यातून आऊट, टीमला मोठा झटका
Icc World Cup 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत दुखापतीचं आणि अस्वस्थेचं सत्र सुरुच आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंडया न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर झालाय. तर आता कॅप्टनही सामन्याला मुकलाय.
मुंबई | टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या याला बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये बॉलिंग दरम्यान दुखापत झाली. हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे हार्दिक पंड्या हा न्यूझीलंड विरुद्ध 22 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यात खेळणार नाही. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर पडल्याने टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियात हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव याला संधी मिळण्याची शक्यता आहे. अशात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये शनिवारी 21 ऑक्टोबरला 2 सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या सामन्यात नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. इंग्लंड विरुद्धच्या या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेचा नियमित कॅप्टन टेम्बा बवुमा हा बाहेर पडला आहे. टेम्बाला अस्वस्थ वाटत असल्याने त्याने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. टेम्बाच्या अनुपस्थितीत एडन मारक्रम याला नेतृत्वाची सूत्र देण्यात आली आहेत.
इंग्लंडने दक्षिण आफ्रिका विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. एडनने त्यावेळेस टॉसदरम्यान टेम्बा खेळणार नसल्याचं सांगितलं. टेम्बाच्या जागेवर प्लेईंग ईलेव्हनमध्ये रीझा हेंड्रिक्स याचा समावेश करण्यात आला आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?
दरम्यान दक्षिण आफ्रिका पॉइंट्स टेबलमध्ये 2 विजयासह तिसऱ्या स्थानी आहे. तर इंग्लंड 1 विजयासह सहाव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा हा या वर्ल्ड कपमधील चौथा सामना आहे. आता या सामन्यात कोण बाजी मारतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.
टेम्बा बावुमा ‘आऊट’
Temba Bavuma ruled out against England due to illness. pic.twitter.com/hKWoYZA7Up
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 21, 2023
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, डेव्हिड विली, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि रीस टोपले.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.