ENG vs SA | इंग्लंडने टॉस जिंकला, टीमचा कॅप्टन बदलला

England vs South Africa Toss | इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी बदल केले आहेत.

ENG vs SA | इंग्लंडने टॉस जिंकला, टीमचा कॅप्टन बदलला
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 2:16 PM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आज 21 ऑक्टोबर रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला. कॅप्टन जॉस बटलर याने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. या सामन्यासाठी दोन्ही टीमच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन बदलला

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका टीमचा कॅप्टन बदलला आहे. इंग्लंड विरुद्ध नियमित कर्णधार टेम्बा बावुमा हा नेतृत्व करणार नाहीये. टेम्बाला अस्वस्थ वाटत असल्याने तो या सामन्यात खेळत नाहीये. त्याच्या जागी टीममध्ये रीझा हेंड्रिक्स याला संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हनमध्ये करण्यात आलेला हा एकमेव बदल आहे.

बेन स्टोक्सचं कमबॅक

इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकूण 3 बदल केले आहेत. घातक ऑलराउंडर बेन स्टोक्स याचं टीममध्ये कमबॅक झालं आहे. डेव्हिड विली आणि गुस ऍटकिन्सन या दोघांचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर सॅम करन आणि ख्रिस वोक्स या दोघांना डच्चू देण्यात आला आहे.

दोन्ही टीम उलटफेरची शिकार

दरम्यान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना आपल्या गेल्या मॅचमध्ये उलटफेरचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानने वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडचा धुव्वा उडवला. तर नेदरलँड्सने चोकर्सचा शिक्का असलेल्या दक्षिण आफ्रिकावर विजय मिळवला.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 7 वेळा आमनासामना झाला आहे. इंग्लंड दक्षिण आफ्रिका विरुद्ध किंचितशी वरचढ राहिली आहे. इंग्लंडने 4 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 3 वेळा बाजी मारली आहे.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, डेव्हिड विली, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि रीस टोपले.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.