World Cup 2023 | या तारखेपासून तिकीट विक्रीला सुरुवात, टीम इंडिया-पाकिस्तान मॅचची बुकिंग केव्हा करायची?

ICC World Cup Online Ticket | आयसीसीने वनडे वर्ल्ड कपचं नवं वेळापत्रक जाहीर केलं. यासह तिकीटबाबतही मोठी अपडेट दिली आहे.

World Cup 2023 | या तारखेपासून तिकीट विक्रीला सुरुवात, टीम इंडिया-पाकिस्तान मॅचची बुकिंग केव्हा करायची?
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 11:17 PM

Icc World Cup 2023 | आयसीसीने आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक आज (9 ऑगस्ट) प्रसिद्ध केलं. आयसीसीने एकूण 9 सामन्यांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. या 9 पैकी 2 सामने हे टीम इंडियाचे आहेत. इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला होणारा सामना आता 14 ऑक्टोबरला होणार आहे. तर इंडिया विरुद्ध नेदरलँड यांच्यात 12 नोव्हेंबरचा सामना 11 नोव्हेंबरला होणार आहे. आयसीसीने यासह वर्ल्ड कप सामन्यांच्या तिकीट विक्रीबाबतही मोठी माहिती दिली आहे.

आयसीसीने तिकीट विक्रीबाबतची अंतिम तारीख जाहीर केली आहे. वर्ल्ड कप साखळी सामन्यांची तिकीटं ही 25 ऑगस्टपासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला पार पडणार आहे. हे सर्व सामने देशातील एकूण 10 प्रमुख शहरातील स्टेडियममध्ये पार पडणार आहेत. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी तिकीट विक्रीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

क्रिकेट चाहते 2 पद्धतीने तिकीट खरेदी करु शकतात. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तिकीट उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती जय शाह यांनी दिली. क्रिकेट चाहते आयसीसीच्या वेबसाईटवरुन ऑनलाईन तिकीट खरेदी करु शकतात. मिळालेल्या माहितनुसार, 25 ऑगस्टपासून तिकीटविक्रीला सुरुवात होणार आहे. मात्र सेमी फायनल आणि फायनल मॅचचे तिकीट हे 15 सप्टेंबरपासून खरेदी करता येतील.

हे सुद्धा वाचा

जय शाह काय म्हणाले?

आयीसीसी वेबसाईट व्यतिरिक्त 7-8 माध्यमातून ऑफलाईन तिकीट उपलब्ध होतील, असंही जय शाह यांनी स्पष्ट केलं. तसेच जे क्रिकेट चाहते ऑनलाईन तिकीट बूक करतील, त्यांना स्टेडियममध्ये तिकीटाची प्रिंट सोबत ठेवणं बंधनकारक असेल, असंही शाह यांनी सांगितलं.

तिकीट बूक कसं करायचं?

वर्ल्ड कप सामन्यांच्या तिकीटसाठी क्रिकेट चाहत्यांना आयसीसी वेबसाईटवर 15 ऑगस्टपासून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतर आयसीसीकडून पुढील माहिती देण्यात येणार आहे.

दरम्यान टीम इंडियाच्या सामन्यांती तिकीटं 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान खरेदी करता येतील. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याचं तिकीट 3 सप्टेंबरला खरेदी करता येणार आहे.

टीम इंडियाच्या सामन्यांचे तिकीट विक्रीचं वेळापत्रक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 31 ऑगस्ट भारत विरुद्ध अफगाणिस्तान – 31 ऑगस्ट भारत विरुद्ध बांग्लादेश – 31 ऑगस्ट भारत विरुद्ध इंग्लंड – 1 सप्टेंबर भारत विरुद्ध न्यूझीलंड – 1 सप्टेंबर भारत विरुद्ध श्रीलंका – 1 सप्टेंबर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 2 सप्टेंबर भारत विरुद्ध नेदरलँड – 2 सप्टेंबर भारत विरुद्ध पाकिस्तान – 3 सप्टेंबर

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.