IND vs AUS CWC 23 | ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, टीम इंडियातून शुबमन गिल बाहेर

Icc World Cup 2023 India vs Australia Toss | टीम इंडियाचा हुकमाचा एक्का शुबमन गिल हा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्या सामन्याला आजारपणामुळे मुकला आहे. त्याच्या जागी कुणाला संधी?

IND vs AUS CWC 23 | ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, टीम इंडियातून शुबमन गिल बाहेर
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 2:29 PM

चेन्नई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पाचवा सामना रविवारी 8 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यासाठी तयार आहेत. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया कॅप्टन पॅट कमिन्स याने टॉस जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात तगडा झटका लागला. टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन शुबमन गिल हा आजारामुळे पहिल्या सामन्यातून बाहेर झाला आहे. शुबमन गिल याच्या जागी ईशान किशन याला संधी देण्यात आली आहे. आता ईशान किशन कॅप्टन रोहित शर्मा याच्यासोबत ओपनिंग करणार आहे. शुबमन गिल याला डेंग्युची लागण झाली आहे. “शुबमन टीममधून बाहेर झालेला नाही. तो खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय आम्ही अखेरच्या क्षणी घेऊ”,असं टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड म्हणाला होता. त्यानुसार आता आजारामुळे शुबमनला मुकावं लागलं आहे.

ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया रेकॉर्ड

दरम्यान टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये एकूण 12 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. इथे ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 8 वेळा विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाला फक्त 4 सामन्यात कांगारुंना उपट देता आली आहे. मात्र वनडे वर्ल्ड कप 2019 नंतर दोन्ही संघांनी बरोबरीची लढत दिली आहे. गेल्या 4 वर्षांपासून उभयसंघात 12 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. या 12 पैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 6-6 सामने जिंकले आहेत.

नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.