IND vs BAN Playing 11 | बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन निश्चित!

Team India Playing 11 Against Bangaladesh | टीम इंडिया बांगलादेशचा धुव्वा उडवण्यासाठी तयार आहे. पाहा बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन कशी असेल.

IND vs BAN Playing 11 | बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन निश्चित!
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 9:09 PM

पुणे | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये दणक्यात सुरुवात केली. टीम इंडियाने अद्याप खेळलेल्या तिन्ही सामन्यात दमदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने 5 वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाला तुडवत विजयी सलामी दिली. त्यानंतर अफगाणिस्तानची धुलाई करत सलग दुसरा विजय मिळवला. तर शनिवारी 14 नोव्हेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करत टीम इंडियाने विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. आता टीम इंडिया आपला चौथा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध 2 हात करणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील हा सामना पुण्यातील एमसीएच्या गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाकडून प्लेईंग ईलेव्हनमधून कुणाला संधी मिळेल, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. टीम इंडियाची संभावित प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळू शकते हे आपण जाणून घेऊयात.

सलामी जोडीची कोण?

कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे दोघे ओपनिंग करणार असल्याचं निश्चित आहे. दोघांची अंडरस्टँडिग जबरदस्त आहे. दोघांनी आतापर्यंत अनेक मोठ्या भागीदाऱ्या केल्या आहेत. या दोघांकडून दमदार सुरुवातीची अपेक्षा असणार आहे. कॅप्टन रोहित शर्मा जबरा फॉर्ममध्ये आहे. तर शुबमनने दुखापतीनंतर पाकिस्तान विरुद्ध कमबॅक केलंय. त्यामुळे शुबमनकडून आता त्याच्या नेहमीच्या पठडीतल्या खेळीची अपेक्षा चाहत्यांना असणार आहे. तर विराट कोहली नेहमीप्रमाणे वनडाऊन येईल.

मिडल ऑर्डरवर मोठी जबाबदारी

सलामी जोडी, वनडाऊनंतर मिडल ऑर्डरवर मोठी जबाबदारी असते. त्यानुसार, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांवर मोठी जबाबदारी असणार आहे. केएल राहुल आणि श्रेयस या दोघांना सुर गवसला आहे. त्यामुळे हे दोघे आणखी मोठी खेळी करण्याचा प्रयत्नात असणार आहे. त्यासाठी बांगलादेश विरुद्धचा सामना हा परफेक्ट आहे. त्यामुळे या दोघांच्या कामगिरीकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असेल.

3 ऑलराउंडर्सवर दुहेरी जबाबदारी

टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध 3 अष्टपैलू खेळाडूंसह उतरेल. उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा दोघांची नावं निश्चित आहे. मात्र तिसऱ्या नावासाठी आर अश्विन आणि शार्दुल ठाकुर या दोघांमध्ये चढाओढ आहे.

जसप्रीत बुमराह आणि मोह्म्मद सिराज या दोघांकडे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. तर कुलदीप यादव याला टीममध्ये कायम ठेवण्यात येणार आहे.

बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाची संभावित प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.