IND vs NED | टीम इंडिया-नेदरलँड्स 12 वर्षांनी आमनेसामने, असा आहे रेकॉर्ड

india vs netherlands warm up match icc world cup 2023 | नेदरलँड्सने आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर्स स्पर्धेतून वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट मिळवलंय. नेदरलँड्सने याआधी 12 वर्षांपूर्वी वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं होतं.

IND vs NED | टीम इंडिया-नेदरलँड्स 12 वर्षांनी आमनेसामने, असा आहे रेकॉर्ड
रोहित शर्माने एका वर्षात सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि ए बी डिव्हीलियर्स यांचा विक्रम मोडलाय.
Follow us
| Updated on: Oct 01, 2023 | 9:37 PM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कपला आता मोजून 3 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना हा 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी एकूण 10 संघ हे सराव सामने खेळत आहेत. प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध 2 सामने खेळणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध होता. मात्र हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता टीम इंडियाचा दुसरा सामना हा नेदरलँड विरुद्ध होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड यांच्यातील सराव सामना हा 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निमित्ताने दोन्ही संघ 12 वर्षांनी पुन्हा आमनेसामने असणार आहेत. पावसामुळे पहिला सामना वाहून गेल्याने आता दुसऱ्या सराव सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांकडे लक्ष लागलं आहे. टीम इंडिया-नेदरलँड्स यांच्यात आतापर्यंत एकूण 3 सामने खेळवण्यात आले आहेत.

टीम इंडिया-नेदरलँड्स यांच्यातील 3 पैकी 2 एकदिवसीय आणि 1 टी 20 सामना खेळवण्यात आला आहे. उभयसंघ 2003 पहिल्यांदा आमनेसामने आले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियानेच विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या तुलनेत नेदरलँड्स टीम लिंबूटिंबू आहे. मात्र सध्या कुणालाही गृहीत धरणं योग्य नाही.

दरम्यान हा सराव सामना ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर स्कॉट एडवर्ड्स याच्याकडे नेदरलँड्सची धुरा असणार आहे.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

नेदरलँड्स क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.