IND vs NED | टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना पावसामुळे रद्द, क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी

India vs Netherlands Warmup Match Cancel | टीम इंडिया आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांसाठी वर्ल्ड कपआधी सरावाच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. मात्र अखेर पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने हा सामना रद्द करण्यात आला आहे.

IND vs NED | टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना पावसामुळे रद्द, क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 5:06 PM

तिरुवनंतरपुरम | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. त्याआधी सर्व संघ हे सराव सामने खेळून वर्ल्ड कपची तयारी करत आहेत. वर्ल्ड कपमधील नववा सराव सामना हा टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात खेळवण्यात येणार होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआयने ट्विट करत हा टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने स्टेडियममध्ये आलेल्या क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

टीम इंडिया-नेदरलँड्स सामन्याला वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार होती. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार होता. मात्र पाऊस इतका जोरदार सुरु होता की टॉसही होऊ शकला नाही. त्यानंतर दुपारी 4 वाजेपर्यंत पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र त्यानंतरही पाऊस न थांबल्याने अखेर सामना रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला.

पावसामुळे सलग दुसऱ्या सामन्याचा खेळखंडोबा

दरम्यान पावसामुळे टीम इंडियाचा सलग दुसरा सामना टॉसशिवाय पावसामुळे रद्द करावा लागला. याआधी टीम इंडियाचा 30 सप्टेंबर रोजी इंग्लंड विरुद्ध पहिला सराव सामना होता. हा सामना देखील पावासामुळे रद्द करावा लागला होता. पाऊस सातत्याने सामन्यात हजेरी लावतोय. त्यामुळे वर्ल्ड कपमधील मुख्य सामन्यांमध्येही पावसाने हजेरी लावल्यास क्रिकेट चाहत्यांना संताप होऊ शकतो. तसेच बीसीसीआय आणि आयसीसीने पावसादरम्यान वर्ल्ड कपचं आयोजन का केलंय, असाही संतप्त सवाल आता क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना पावसामुळे रद्द

आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

वर्ल्ड कपसाठी नेदरलँड्स क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.