IND vs NED | पावसाचा वर्ल्ड कपमध्येही खोडा, टीम इंडिया-नेदरलँड्स सामन्याला विलंब
India vs Netherlands Warmup Match Toss delayed | वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामने हे पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. तर काही सामने हे डकवर्थ लुईस नियमांनुसार पार पडले आहेत. आता हा सामना केव्हा सुरु होतोय, याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.
तिरुवनंतपुरम | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील नववा सराव सामना हा टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे ग्रीनफिल्ड स्टेडियम तिरुवनंतपुरम इथे करण्यात आलं आहे. या सामन्याला नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार होती. तर त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणं अपेक्षित होता. मात्र पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया, नेदरलँड्ससह सर्व क्रिकेट चाहते पाऊस थांबून टॉस कधी होतोय, या प्रतिक्षेत आहेत.
वर्ल्ड कपआधी प्रत्येक टीम 2 सराव सामने खेळणार आहे. टीम इंडिया आणि नेदरलँड्सचा हा दुसरा सराव सामना आहे. टीम इंडियाचा याआधीचा पहिला सराव सामना हा शनिवारी 30 सप्टेंबर रोजी इंग्लंड विरुद्ध होता. मात्र हा सामना पावसामुळे एकही बॉल न टाकता रद्द करण्यात आला. तर नेदरलँड्सचाही पहिला सराव सामना 30 सप्टेंबरलाच होता. नेदरलँड्ससमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान होतं. मात्र पावसामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
त्यानंतर आता दोन्ही संघ वर्ल्ड कपआधी या अखेरच्या सराव सामन्यासाठी सज्ज आहेत. मात्र सामन्यात टॉसआधीच पावसाने खोडा घातलाय. त्यामुळे अजून टॉस काही होऊ शकलेला नाही. बीसीसीआयने ट्विट करत तिरुवनंतरपुरममध्ये पावसामुळे टॉसला विलंब झाल्याची माहिती क्रिकेट चाहत्यांना दिली आहे. आता टॉसबाबत पुढील अपडेट केव्हा येते हे पाहावं लागणार आहे.
तिरुवनंतपुरममध्ये पाऊस, टॉसला उशीर
Hello from Thiruvananthapuram 👋
Toss for the warm-up match between India and Netherlands has been delayed due to rain 🌧️
Stay tuned for further updates.#TeamIndia | #CWC23 pic.twitter.com/QxykCd9RbT
— BCCI (@BCCI) October 3, 2023
आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
वर्ल्ड कपसाठी नेदरलँड्स क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.