IND vs NZ | टीम इंडिया धोनीच्या रनआऊटचा बदला घेणार? बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध महामुकाबला
India vs New Zealand |
मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 अखेरच्या टप्प्यात आहे. 13 वर्ल्ड कपमधील 3 सामने बाकी आहेत. या स्पर्धेत 2 सेमी फायनल आणि 1 सामना होणार आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड भिडणार आहेत. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. पहिला सेमी फायनल सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे. टीम इंडिया न्यूझीलंड यांच्यात फायनलमध्ये पोहचण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.
टीम इंडियाकडे या सामन्यानिमित्ताने 4 वर्षांपूर्वीचा हिशोब क्लिअर करण्याची संधी आहेत. याच न्यूझीलंडने टीम इंडियाला वर्ल्ड कप 2019 च्या सेमी फायनलमध्ये पराभूत केलं होतं. महेंद्रसिंह धोनी याला रन आऊट करुन न्यूझीलंडने भारतीयांची मनं तोडली होती. त्यामुळे यंदा कॅप्टन रोहित शर्मा याला आपल्या घरच्या मैदानात न्यूझीलंडला लोळवून धोनीच्या रनआऊटचा बदला घेण्याची संधी आहे.
टीम इंडियाची साखळी फेरीतील कामगिरी
दरम्यान टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील साखळी फेरीत कडक कामगिरी केली. टीम इंडियाने खेळलेल्या 9 सामन्यांपैकी 9 सामन्यात विजय मिळवला. टीम इंडियावर कोणत्याच संघाला वरचढ होता आलं नाही. टीम इंडियाने सलग 7 विजयासह सेमी फायनलमध्ये क्वालिफाय केलं. टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिलीच टीम ठरली. तसेच त्यानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सवर मात करत साखळी फेरीत अजिंक्य राहण्याचा कारनामा केला.
तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडनेही सलग 4 सामने जिंकले. मात्र टीम इंडियाने न्यूझीलंडला पाचव्या सामन्यात पराभूत करत त्यांना रोखलं. त्यानंतर न्यूझीलंडने पुढील 3 सामने गमावले. मात्र न्यूझीलंडने साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकून सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं. त्यामुळे टीम इंडिया-न्यूझीलंड यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळणार, हे मात्र निश्चित आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
न्यूझीलंड क्रिकेट टीम | केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम लॅथम (विकेटकीपर), डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, कायल जेमिसन, जेम्स नीशम आणि विल यंग.