IND vs NZ Head To Head | टीम इंडिया-न्यूझीलंड यांच्यात वरचढ कोण? आकडे कुणाचे भारी?
India vs New Zealand Head To Head Records | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड हे दोन्ही संघ 2019 नंतर पुन्हा एकदा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या सेमी फायनलमध्ये आमनेसामने आले आहेत. या दोन्ही संघांपैकी वरचढ कोण आहे? आकडेवारी कुणाच्या बाजूने? जाणून घ्या.
मुंबई | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्या सेमी फायनलसाठी सज्ज आहे. टीम इंडिया सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. केन विलियमसन हा सामना 15 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांमध्येही या सामन्यासाठी उत्साहाचं वातवरण आहे. या सेमी फायनलनिमित्ताने आपण टीम इंडिया-न्यूझीलंड यांच्यातील हेड टु हेड आकडे जाणून घेऊयात.
दोन्ही संघांची साखळी फेरीतील कामगिरी
टीम इंडियाने साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने साखळी फेरीत न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडने साखळी फेरीत सलग 4 सामने जिंकल्यानंतर 4 सामने गमवावे लागले. मात्र शेवटचा सामना जिंकून न्यूझीलंडने सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं.
आकडेवारी काय सांगते?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात गेल्या 48 वर्षांमध्ये 117 एकदिवसीय सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये टीम इंडियाचा बोलबाला राहिला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडवर 59 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. तसेच 1 सामना हा टाय राहिला आहे. तर 7 सामन्यांचा निकालच लागू शकला नाही.
वर्ल्ड कपमधील आकडे
दरम्यान टीम इंडिया-न्यूझीलंड यांच्यात वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 10 सामने झाले आहेत. इथे न्यूझीलंड टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. न्यूझीलंडने टीम इंडियावर 10 पैकी 5 सामन्यात विजय मिळवलाय. टीम इंडियाने न्यूझीलंडला 4 सामन्यात चितपट केलंय. तर एक सामना हा रद्द झाला.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
न्यूझीलंड क्रिकेट टीम | केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम लॅथम (विकेटकीपर), डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, कायल जेमिसन, जेम्स नीशम आणि विल यंग.