Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WC 2023, IND vs PAK | भारत-पाकिस्तान 15 ऑक्टोबरला आमनेसामने, रोहितसेनेचं टेन्शन वाढलं

India vs Pakistan World Cup 2023 | साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे वर्ल्ड कपपेक्षा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे लागलं आहे. हा हायव्होल्टेज सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

WC 2023, IND vs PAK | भारत-पाकिस्तान 15 ऑक्टोबरला आमनेसामने, रोहितसेनेचं टेन्शन वाढलं
एकदिवसीय विश्वाच्या इतिहासात पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. पाकिस्तानला प्रत्येक वेळी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 9:42 PM

मुंबई | टीम इंडिया आणि पाकिस्तान, 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ. राजकीय संबंधांमुळे गेल्या दशकापेक्षा अधिक कालावधीपासून दोन्ही संघात द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही. त्यामुळे दोन्ही हे चिरप्रतिद्वंदी संघ हे आशिया कप आणि आयसीसी स्पर्धेत एकमेकांविरुद्ध येतात. आता आशिया कप आणि त्यानंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. आशिया कप स्पर्धेच्या सविस्तर वेळापत्रकाआधी आयसीसी विश्व चषकाचं टाईमटेबल प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया-पाकिस्तान 15 ऑक्टोबर रोजी आमनेसामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे.

या कट्ट्रर प्रतिस्पर्धी संघांच्या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष आहे. आता सर्व क्रिकेट चाहत्यांना 15 ऑक्टोबरची प्रतिक्षा असणार आहे. मात्र या सामन्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन दुप्पट झालं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. टेन्शन दुप्पट होण्याचं प्रमुख कारण म्हणजे टीम इंडियाची वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध असलेली कामगिरी. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील आकडेवारी नक्की कुणाच्या बाजूने आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा

भारत विरुद्ध पाकिस्तान

आकडे काय सांगतात?

टीम इंडिया-पाकिस्तान वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 132 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये टीम इंडियाची पडती तर पाकिस्तानची बाजू मजबूत आहे. पाकिस्तानने टीम इंडियावर एकूण 73 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने पाकिस्तानवर 55 वेळा विजय मिळवला आहे. तर 4 सामन्यांचा निकाल लागू शकलेला नाही. हीच आकडेवारी टीम इंडियासाठी पर्यायाने कॅप्टन रोहित शर्मासाठी चिंताजनक आहे.

द्विपक्षीय मालिकेतील आकडेवारी

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 17 द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आल्या आहेत. यामध्येही पाकिस्तानचा वरचष्मा राहिला आहे. पाकिस्तानने 17 पैकी 11 मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाला त्या तुलनेत 50 टक्के कामगिरीही करता आलेली नाही. टीम इंडियाला केवळ 5 मालिकांमध्येच यश मिळवता आलंय. तर 1 सीरिज ड्रॉ राहिली आहे.

दिलासादायक बाब अशी की टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध वनडेत 6 वर्षांपासून एकही सामना गमावेलला नाही. टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील अखेरचा सामना हा 2019 मध्ये खेळवण्यात आलेला. या सामन्यात टीम इंडियाने 89 धावांनी विजय मिळवला होता. तर पाकिस्तानला 2017 नंतर भारताविरुद्ध जिंकता आलेलं नाही.

वर्ल्ड कप आकडेवारी

दरम्यान वनडे वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही संघांमध्ये एकूण 7 वेळा आमनासामना झाला. या सातही सामन्यात टीम इंडियाच जिंकली आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यातही टीम इंडिया वर्ल्ड कपमधील विजयी घोडदौड कायम राखेल, अशीच आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.