NZ vs BAN Toss | बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंडने टॉस जिंकला, टीमने कॅप्टन बदलला
New Zealand vs Bangladesh Toss | उपविजेत्या न्यूझीलंड क्रिकेट टीमने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातून आपला कॅप्टन बदलला आहे. जाणून घ्या दोन्ही टीमची प्लेईंग ईलेव्हन.
चेन्नई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील 11 वा सामना आज 13 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येत आहे. या 11 व्या सामन्यात उपविजेता न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकला आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. बांगलादेश आणि न्यूझीलंड दोन्ही टीममध्ये बदल करण्यात आला आहे.
दोन्ही संघात बदल
न्यूझीलंड आणि बांगलादेश दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. अनेक महिन्यांनी न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियमसन याची टीममध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडची ताकद वाढली आहे. केन विलियमसन याच्यामुळे विल यंग याला बाहेर बसावं लागलं आहे. तर बांगलादेश टीमने प्लेईंग ईलेव्हनमध्ये मेहदी हसन याच्या जागी महमदुल्लाह याला संधी दिली आहे.
न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश वर्ल्ड कपमधील आकडे
न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश दोन्ही संघ आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एकूण 5 वेळा आमनेसामने आले आहेत. या 5 सामन्यात न्यूझीलंडचाच दबदबा राहिला आहे. न्यूझीलंडने पाचही सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवत धुव्वा उडवला आहे. त्यामुळे न्यूझीलंड हा सामना जिंकून विजयी षटकार मारण्याच्या तयारीत आहे. तर बांगलादेश उलटफेर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
चेन्नईत न्यूझीलंड टॉसचा बॉस
Toss news from Chennai 📰
Kane Williamson calls it right at the toss and New Zealand opt to bowl first 🏏#CWC23 | #NZvBAN 📝: https://t.co/kTzaBkEaFO pic.twitter.com/FuuzrXxpaz
— ICC (@ICC) October 13, 2023
पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?
दरम्यान न्यूझीलंड आणि बांगलादेश या दोन्ही संघांचा हा या वर्ल्ड कपमधील तिसरा सामना आहे. बांगलादेशने 2 पैकी 1 सामना जिंकलाय आणि एक गमावलाय. तर न्यूझीलंडने दोन्ही सामने जिंकलेत. न्यूझीलंड पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या आणि बांगलादेश सहाव्या स्थानी आहे.
बांग्लादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकिब अल हसन (कर्णधार), लिटॉन दास, तांजीद हसन, नजमुल हुसैन शांतो, मेहदी हसन मिराज,मुश्फिकुर रहीम (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | केन विलियमसन (कॅप्टन), डेव्हॉन कॉन्वहे, रचिन रवींद्र, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिचेल सँटनर, मॅट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन आणि ट्रेन्ट बोल्ट.