World Cup 2023 : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वात ‘म्हातारा’ खेळाडू कोण? एका भारतीयाचा समावेश!
ICC World Cup 2023 : वर्ल्ड कपचा थरार सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्व संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात वयस्कर खेळाडूंच्या यादीमध्ये भारताच्या एका खेळाडूचा समावेश आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
मुंबई : यंदाच्या आयसीसी वर्ल्ड कप 2023 ला सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्व संघ भारतामध्ये दाखल झाले असून आता सराव सामने सुरू आहेत. 5 ऑक्टोबरला वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना होणार असून चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्येही सर्वात वयस्कर खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहेत. या यादीमध्ये एका भारतीय खेळाडूचाही समावेश आहे.
कोण आहेत सर्वात वयस्कर खेळाडू?
यंदाच्या वर्ल्डकप मध्ये सर्वात वयस्कर खेळाडू नेदरलँड संघाचा आहे. वेस्ली बॅरेसी असं त्याचं नाव असून आता तो 39 वर्षे 149 इतकी आहे. वेस्ली बॅरेसीहा फलंदाज असून 2010 मध्ये त्याने नेदरलँडसाठी पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्याने एक 45 सामन्यांमध्ये नेदरलँड संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
यादीमध्ये दुसरा खेळाडूही नेदरलँड संघाचा असून त्याचं नाव रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे. तो आता 38 वर्ष 272 दिवसांचा आहे. 2009 साली रोएलॉफ इरास्मसने नेदरलँड साठी वनडे मध्ये पदार्पण केलं होतं. मात्र त्याने अवघे 16 वनडे सामने खेळले असून त्याची वर्ल्ड कप संघात निवड झालेली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ऑल राऊंडर खेळाडू मोहम्मद नबी या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. मोहम्मद नबी 38 वर्षे 271 दिवसांचा असून त्याचा हा तिसरा वर्ल्ड कप आहे. 2009 साली नबीने वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत नबीने 147 सामन्यांमध्ये संघाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे.
या यादीमध्ये चौथ्या स्थानी बांगलादेशचा माजी कर्णधार महमुदुल्लाह रियाध आहे. महमुदुल्लाह याचं वय 37 वर्षे 237 दिवस इतकं आहे महमुदुल्लाने 2007 साली पदर्पण केलं आहे. महमुदुल्लाचा हा चौथा वर्ल्ड कप असणार आहे. या यादीमध्ये भारतीय खेळाडूचा समावेश आहे.
पाचवा खेळाडू भारतीय असून त्याचं वय 37 वर्षे 12 दिवस आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून रविचंद्रन अश्विन आहे. अक्षर पटेल याला दुखापत झाल्याने त्याच्या जागी संघात अश्विनला संधी मिळाली आहे. 2011 आणि 2015 चा वर्ल्ड कप अश्विनने खेळला होता. 2019 साली त्याला संघात जागा मिळाली नव्हती.