PAK vs NED | नेदरलँड्ससमोर पाकिस्तान ढेर, विजयासाठी 287 धावांचं आव्हान
Icc Odi World Cup 2023 Pakistan vs Netherlands | नेदरलँड्सच्या बास डी लिडे याने 4 विकेट्स घेत पाकिस्तानला बॅक फुटवर ढकललं. लिडेच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानला पूर्ण 50 ओव्हर खेळण्यात अपयश आलं.
हैदराबाद | आयसीसी वनडे रँकिंगमधील नंबर 2 टीम पाकिस्तान क्रिकेट टीम 14 नंबर टीम नेदरलँड्ससमोर ढेर झाली आहे. नेदरलँड्ससमोर पाकिस्तानला 50 ओव्हरही नीट खेळता आलं नाही. पाकिस्तान 49 ओव्हरमध्ये 286 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे नेदरलँड्सला विजयासाठी 287 धावांचं आव्हान मिळालं आहे. पाकिस्तानकडून विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद रिझवान आणि सौद शकील या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी 68 धावा केल्या. तर नेदरलँड्सकडून बास दी लिडे याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
नेदरलँड्सची शानदार सुरुवात
नेदरलँड्सने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. नेदरलँड्सने पाकिस्तानला सुरुवातीपासून झटपट 3 धक्के दिले. पाकिस्तानचे पहिले 3 फलंदाज फ्लॉप ठरले. फखर झमान, इमाम उल हक आणि बाबर आझम या तिघांना 20 पारही मजल मारता आली नाही. फखर झमान 12, इमाम उल हक 15 आणि कॅप्टन बाबर आझम 5 धावांवर आऊट झाले. त्यामुळे पाकिस्तानची 3 बाद 38 अशी स्थिती झाली. त्यानंतर रिझवान आणि सऊद या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे पाकिस्तानचा डाव सावरला. मात्र त्यानंतर दोघेही आऊट झाले. सौद शकील याने 52 बॉलमध्ये 68 तर रिझवान याने 75 बॉलमध्ये 68 धावा केल्या.
पाकिस्तान 286 धावांवर ऑलआऊट
2️⃣8️⃣6️⃣ on the board 🏏@76Shadabkhan and @mnawaz94 with important contributions towards the end after 6️⃣8️⃣ each from @saudshak and @iMRizwanPak 👏#PAKvNED | #DattKePakistani | #WeHaveWeWill pic.twitter.com/WwypcIlfsI
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 6, 2023
त्यानंतर इफ्तिखार अहमद याने 9, मोहम्मद नवाझ याने 39, शादाब खान 32 आणि हरीस रौफ याने 16 धावा केल्या. शाहिन आफ्रिदी याने नाबाद 13 धावा केल्या. तर हसन अली याला भोपळाही फोडता आला नाही. तसेच नेदरलँड्सकडून बास डी लिडे याने 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कॉलिन अकरमन याने 2 विकेट्स घेतल्या. तर आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन आणि व्हॅन बीक या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
पाकिस्तान टीम प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), इमाम उल हक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.