CWC 23 PAK vs SL Toss | पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेने टॉस जिंकला, टीममध्ये घातक बॉलरची एन्ट्री
Pakistan vs Sri Lanka Icc World Cup 2023 Toss | पाकिस्तान आणि श्रीलंका या आशिया खंडातील बड्या संघांचा हा विश्व चषक 2023 मधील दुसरा सामना आहे.
हैदरबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील दुसऱ्या डबल हेडरचं आज 10 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आलं आाहे. या डबर हेडरमधील पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका भिडणार आहेत. या सामन्याला दुपारी 2 वाजता हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला. श्रीलंका कॅप्टन दासून शनाका याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपल्या वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यासाठी टीममध्ये प्रत्येकी 1-1 बदल केला आहे.
दोन्ही संघात 1-1 बदल
या सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तानने टीममध्ये 1 बदल केला आहे. श्रीलंका टीममध्ये स्टार स्पिनर महीश तीक्ष्णा याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे एका झटक्यात श्रीलंका टीमची ताकद दुप्पट झाली आहे. तर पाकिस्तान टीमने फखर झमान याच्या जागी अबदुल्लाह शफीक याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश केला आहे.
दरम्यान या वर्ल्ड कपमधील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. पाकिस्तानने आपला पहिला सामना जिंकला आहे. तर श्रीलकेची पराभवाने वर्ल्ड कपमधील सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेदरलँड्स टीमचा पराभव केला. पाकिस्तानने नेदरलँड्सवर 81 धावांनी मोठा विजय मिळवला. हा सामना 6 ऑक्टोबर रोजीपार पडला होता.
तर श्रीलंका टीमने आपला सलामीचा सामना हा 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध पार पडला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात श्रीलंकेचा 102 धावांनी धुव्वा उडवला होता. ताज्या आकडेवारीनुसार पाकिस्तान पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर श्रीलंका शेवटून दुसऱ्या म्हणजे नवव्या क्रमांकावर आहे.
श्रीलंकेने टॉस जिंकला
🚨 TOSS & PLAYING XI 🚨
Sri Lanka win the toss and elect to bat first 🏏
One change to our team today 👇#PAKvSL | #DattKePakistani | #WeHaveWeWill pic.twitter.com/fZc7b2kjyM
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 10, 2023
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शनाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना आणि दिलशान मधुशंका.