World Cup 2023 Points Table | टीम इंडियाची विजयी सुरुवात, रोहितसेना पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?
India vs Australia Icc World Cup 2023 Points Table | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 टीम कोण? टीम इंडिया पहिल्या विजयानंतर कितव्या स्थानी? पाहा पॉइंट्स टेबलमध्ये एकूण 10 संघांची स्थिती
चेन्नई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पाचवा सामना हा रविवारी 8 ऑक्टोबरला पार पडला. या सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. टीम इंडियाने या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मात करत विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने यासह पॉइंट्स टेबलमध्ये खातं उघडलं आणि 2 गुण मिळवले. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया या सामन्यानंतर वर्ल्ड कपमधील पहिली फेरी पूर्ण झाली. या पहिल्या फेरीत 10 टीमचा प्रत्येकी 1 सामना खेळून पूर्ण झाला आहे. या पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणती टीम कोणत्या स्थानी आहे, हे आपण पाहुयात.
पहिल्या फेरीनंतर 5 टीमने प्रत्येकी 2 पॉइंट्स मिळवले. तर 5 संघ येत्या सामन्यात खातं उघडण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. टीम इंडियाला विजयानंतर 2 पॉइंट्स मिळाले. मात्र टीम इंडियाला नेट रन रेटमध्ये विशेष काही कमाल करता आली नाही. त्यामुळे टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. टीम इंडियाचा नेट रन रेट हा टॉप 4 संघांच्या तुलनेत कमी आहे. टीम इंडियाचा नेट रन रेट हा +0.883 इतका आहे. तर ऑस्ट्रेलिया पराभवासह नवव्या स्थानी फेकली गेली आहे.
टीम इंडियाने 200 धावांचा पाठलाग करताना 3 विकेट्स झटपट गमावले. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांनी 165 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवलं. मात्र त्यानंतर विराट 85 धावांवर आऊट झाला. विराट अखेरपर्यंत मैदानात राहिला असता तर टीम इंडियाच्या नेट रन रेटमध्ये नक्कीच फरक पडला असता. तर पॉइंट्स टेबलमध्ये उपविजेता न्यूझीलंड ही टॉपर आहे. न्यूझीलंडने वर्ल्ड कपमधील सलामीच्या सामन्यात इंग्लंडवर स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला. त्यामुळे न्यूझीलंडचा नेट रन रेट हा +2.149 इतका आहे.
न्यूझीलंड टेबल टॉपर
New Zealand are top of the standings after the first round of matches 🇳🇿#CWC23 stats 👉https://t.co/nLlLIqdPDT pic.twitter.com/Z3gt9oIKce
— ICC (@ICC) October 9, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.