R Ashwin | आर अश्विन आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार!

Team India Icc World Cup 2023 Squad | टीम इंडियात आयसीसी वनडे वर्ल्ड कपच्या तोंडावर बदलाचे वारे वाहू लागलेत. अक्षर पटेल याला झालेल्या दुखापतीमुळे त्याची टीम इंडियातून विकेट निश्चित मानली जात आहे. तर अश्विनला संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

R Ashwin | आर अश्विन आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार!
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 10:58 PM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची 5 सप्टेंबर रोजी घोषणा करण्यात आली. आशिया कप टीममधील खेळाडूंनाच वर्ल्ड कपसाठी संधी देण्यात आली. वर्ल्ड कपसाठी अनुभवी आणि 2011 चा वर्ल्ड कप विजेत्या आर अश्विन याला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. अश्विनला संधी न देण्याच्या निर्णयाचा नेटकऱ्यांनी निषेध केला. भारतात वर्ल्ड कप होऊनही अश्विनसारख्या अनुभवी फिरकी गोलंदाजाला संधी का दिली नाही, अशा शब्दात नेटकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे निवड समितीला सवाल केला.

या वर्ल्ड कपसाठी 27 सप्टेंबरपर्यंत टीममध्ये बदल करता येणार आहे. त्यात आशिया कप दरम्यान अक्षर पटेल या ऑलराउंडरला आशिया कप दरम्यान दुखापत झाली. अक्षरची वर्ल्ड कप टीममध्ये निवड करण्यात आलीय. मात्र वर्ल्ड कपच्या आधी आशिया कप सुपर 4 फेरीत अक्षरला दुखापत झाली. अक्षरला या दुखापतीमुळे आशिया कप फायनलमध्ये संधीही देण्यात आली नाही. त्यामुळे भारतातून ऐनवेळेस वॉशिंग्टन सुंदर याला श्रीलंकेत अंतिम सामन्यासाठी जावं लागलं.

अक्षरची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली. मात्र फिटनेसच्या अटीवर. आता अक्षर या मालिकेतील तिसऱ्या सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर पडला. यामुळे अक्षरची वर्ल्ड कपआधी फिटनेस सिद्ध करण्याचीही संधी हुकली. आता अशी चर्चा आहे की अक्षर वर्ल्ड कपमधूनही बाहेर पडू शकतो. अक्षर दुखापतीतून इतक्यात सावरत नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यात वर्ल्ड कपसाठी टीममध्ये विनापरवानगी बदल करण्यासाठीही काही दिवस बाकी आहेत.

त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा आणि निवड समितीला अक्षरबाबत काय तो निर्णय घ्यावा लागेल. आता निवड समिती निर्णय घेईल तो घेईल. मात्र अश्विनची वर्ल्ड कप टीममध्ये निवड होणार म्हणजे होणार, असा ठाम दावा हा केला जात आहे. आता नक्की काय होतं, हे अवघ्या काही तासांमध्येच स्पष्ट होईल.

वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.