Rohit Sharma महारेकॉर्डच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तान विरुद्धच इतिहास रचणार!
Rohit Sharma World Record | टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा हा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. रोहित क्रिकेट विश्वातला सिक्सर किंग होण्यासाठी सज्ज आहे.
नवी दिल्ली | टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप 2023 मोहिमची विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाने विजयसाठी दिलेलं 200 धावांचं आव्हान 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या आव्हानाचं पाठलाग करताना टीम इंडियाची वाईट सुरुवात झाली. ईशान, रोहित आणि श्रेयस अय्यर हे तिघेही झिरोवर आऊट झाले. मात्र त्यानंतर केएल राहुल याने नाबाद 97 आणि विराटने 85 धावांची खेळी करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्यानंतर आता टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला दुसरा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध खेळत आहे.
अफगाणिस्तानने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. अफगाणिस्तानची वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात बांगलादेश विरुद्ध पराभवाने झाली. त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तानचा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
रोहितला ख्रिस गेल याचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्धस्त करण्याची सुवर्णसंधी आहे. रोहितला ख्रिस गेल याचा सर्वाधिक सिक्सचा विश्व विक्रम करण्याची संधी आहे. ख्रिस गेल याने टी 20, वनडे आणि कसोटी या तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून 553 सिक्स ठोकले आहेत. तर रोहित शर्मा याच्या नावावर तिन्ही फॉर्मेटमध्ये 551 सिक्स आहेत. त्यानुसार ख्रिस गेल याचा विक्रम मोडण्यासाठी 3 आणि बरोबरीसाठी 2 सिक्सची गरज आहे. आता रोहितने अफगाणिस्तान विरुद्धच हा वर्ल्ड रेकॉर्ड करावा, अशी आशा क्रिकेट चाहत्यांची आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणारे फलंदाज
ख्रिस गेल : 553 सिक्स.
रोहित शर्मा : 551 सिक्स*.
शाहिद आफ्रिदी : 476 सिक्स.
ब्रँडन मॅक्युलम : 398 सिक्स.
मार्टिन गुप्टील : 383 सिक्स.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.