Icc World Cup 2023 | वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिका टीमची घोषणा, कॅप्टन कोण?

Icc World Cup 2023 | आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी टीममधील खेळाडूंची नावं जाहीर करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे टीम इंडियानंतर वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकाने टीम जाहीर केली आहे.

Icc World Cup 2023 | वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिका टीमची घोषणा, कॅप्टन कोण?
वर्ल्ड कप फायनल ही 16 नोव्हेंबरला होणार असून कोणते संघ प्रवेश करतील याबाबत डेल स्टेनने दोन संघाची नावं घेतली आहेत.
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 4:57 PM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 संघ खेळणार आहेत. वर्ल्ड कपसाठी आयसीसीला आपल्या टीममधील खेळाडूंची नाव पाठवण्याची 5 सप्टेंबर अखेरची तारीख आहे. त्यानुसार बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्ड कप खेळणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.

निवड समितीने शिखर धवन, आर अश्विन, युझवेंद्र चहल या तिघांना वर्ल्ड कपसाठी संधी दिली नाही. तर आशिया कप 2023 च्या 17 मुख्य खेळाडूंमधून प्रसिध कृष्णा आणि तिलक वर्मा यांना वगळलं. त्यामुळे निवड समितीच्या या निर्णयाविरुद्ध नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियानंतर आणखी एका टीमने वर्ल्ड कपसाठी आपला संघ जाहीर केला आहे.

हे सुद्धा वाचा

आता टीम इंडियानंतर साऊथ आफ्रिकेने वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंची नाव जाहीर केली आहेत.दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने आणि आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. टेम्बा बामुवा हा साऊथ आफ्रिका टीमची कॅप्टन्सी करणार आहे. वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिका टीममध्ये 23 वर्षांचा युवा बॉलर जेराल्ड कोएत्झी याची निवड करण्यात आली आहे. कोएत्झी याने आतापर्यंत फक्त 2 वनडे सामने खेळले आहेत. कोएत्झीने 18 मार्च 2023 रोजी विंडिज विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं होतं.

वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिका टीम जाहीर

अनुभवी खेळाडू आणि धारदार बॉलिंग

दक्षिण आफ्रिका टीममध्ये क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रीक्स, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर आणि रॅसी व्हॅन डर डुसेन हे अनुभवी बॅट्समन आहेत. तर बॉलिंगची जबाबजारी ही कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि अॅनरिक नॉर्टजे या तिघांवर वेगवान बॉलिंगची धुरा असेल.

वर्ल्ड कपला 5 ऑक्टोपरपासून सुरुवात होणार आहे. तर दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा 7 ऑक्टोबर रोजी श्रीलंका विरुद्ध खेळणार आहे. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. वर्ल्ड कपमधील मुख्य सामन्यांआधी दक्षिण आफ्रिका 2 सराव सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध सपा सराव सामने खेळणार आहे. पहिला सराव सामान हा 29 सप्टेंबरला अफगाणिस्तान आणि 2 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध सराव सामना होणार आहे.

आयसीसी वर्ल्ड कप 2023 साठी टीम साऊथ आफ्रिका | टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, सिसांडा मागाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी आणि रॅसी वन डेर डुसेन.

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.