Dasun Shanka Ruled Out | श्रीलंका कॅप्टन दासून शनाका वर्ल्ड कपमधून बाहेर, या खेळाडूला संधी
Icc World Cup 2023 | वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये तिसरा राउंड सुरु आहे. या दरम्यान टीमला मोठा झटका लागला आहे. कॅप्टन वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे.
मुंबई | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 12 वा सामना जिंकला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाचा वर्ल्ड कप 2023 मधील सलग तिसरा विजय ठरला. पाकिस्तानकडून मिळालेलं 192 धावांचं आव्हान टीम इंडियाने 30.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या मुंबईकर जोडीने टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा केल्या. रोहितने 86 आणि श्रेयसने नाबाद 53 धावांची खेळी केली. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे टीमचा कॅप्टन हा वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. ट्विटद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप दरम्यान श्रीलंका क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. कॅप्टन दासून शनाका हा दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी टीममध्ये चमिका करुणारत्ने याला संधी देण्यात आली आहे. टीममध्ये बदल करण्यासाठी आयसीसीच्या तांत्रिक समिताने परवानगी दिली आहे.
शनाका याला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात 10 ऑक्टोबर रोजी सामना पार पडला. दासूनला या सामन्यात उजव्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. दासूनला या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं आहे. दासूनला या दुखापतीतून पूर्णपणे ठीक होण्यासाठी 3 आठवड्यांचा वेळ लागू शकतो.
श्रीलंकेची वर्ल्ड कप 2023 मधील आतापर्यंतची कामगिरी
श्रीलंकेने आतापर्यंत यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकूण 2 सामने खेळले आहेत. श्रीलंकेने आपल्या पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर दुसरा पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. श्रीलंकेचा या दोन्ही सामन्यात पराभव झाला. श्रीलंका आपला तिसरा सामना हा 16 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकासमोर या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे.
दासून शनाका आऊट
🚨 The Event Technical Committee of the ICC Men’s Cricket World Cup 2023 has approved Chamika Karunaratne as a replacement for Dasun Shanaka in the Sri Lankan squad.
Karunaratne who has played 23 ODIs, was named as a replacement after Shanaka was ruled out due to a right thigh… pic.twitter.com/pgejuMWjVw
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 14, 2023
श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, महेश थेक्षाना, दुनिथ वेललागे, कसून राजिथा, दुनिथ वेललागे, कासुन राजिथा, मथीशा पथिराणा, दिलशान मधुशंका आणि दुशन हेमंथा.