World Cup, IND vs AUS | टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हन निश्चित!

Team India vs Australia Odi World Cup 2023 | टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना खेळणार आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचं आणि पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व सांभाळणार आहे.

World Cup, IND vs AUS | टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हन निश्चित!
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 4:05 PM

मुंबई | भारतात 12 वर्षानंतर पुन्हा एकदा आयसीसी वनडे वर्ल्ड कपची सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. एकूण 45 दिवस क्रिकेट वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडियासमोर या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. हा सामना एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया विजयी सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन कशी असू शकते हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडियाकडून कुणाला संधी?

चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी पूरक ठरु शकते. तसेच फलंदाजांसाठीही खेळपट्टी मदतशीर ठरु शकते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात 15 पैकी कोणत्या 11 खेळाडूंना संधी द्यायची हा सर्वात मोठा पेच कॅप्टन रोहित शर्मा याच्यासमोर असणार आहे. कारण नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या 3 सामन्यांच्यात एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करत वर्ल्ड कप प्लेईंग ईलेव्हनसाठी आपला दावा मजबूत केला. टीम इंडियाने ही मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली होती.

टीम इंडिया

कॅप्टन रोहित शर्मा याच्यासोबत नेहमीप्रमाणे शुबमन गिल सलामीसाठी येईल. तर विराट कोहली तिसऱ्या स्थानी खेळेल. चौथ्या क्रमांकावर केएल राहुल खेळू शकतो. टीम इंडियाचा उपकर्णधार आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्या पाचव्या स्थानी खेळण्याची संधी मिळू शकते. तर सूर्यकुमार यादव याची सहाव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी पाठवलं जाऊ शकतं. रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येईल. अखेरच्या क्षणी या दोघां-तिघांवर फटकेबाजी करुन फिनीशिंग टच देण्याची जबाबदारी असेल.

बॉलिंगची जबाबदारी कुणावर?

रवींद्र जडेजा याच्यावर बॅटिंगसह फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असेल. तसेच आर अश्विन यालाही संधी मिळणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे जडेजा आणि अश्विन अनुभवी जोडी कागांरुंना फिरकीवर कशी नाचवते,याकडे लक्ष असेल. तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या तिघांवर राहिल.

टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध संभावित प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.