WTC Final 2023 | हेड-स्मिथचं शतक, मोहम्मद सिराजचा भेदक मारा, ऑस्ट्रेलिया 469 धावांवर ऑलआऊट
Wtc Final 2023 IND vs AUS Day 2 | ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 469 धावांवर आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाकडून हेड आणि स्मिथ दोघांनी शतक केलं. तर मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
लंडन | टीम इंडियाने भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रात ऑल आऊट केलं आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 121.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 469 धावांवर धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी शतकं ठोकली. तर टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
पहिल्या दिवशी जोरदार सुरुवातीनंतर भारतीय गोलंदाजांना विकेट्स घेण्यात अपयश आलं. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात 4 आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी 3 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला ब्रेक लावला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड याने 163 धावांची खेळी केली. तर स्टीव्हन स्मिथ याने 121 धावा केल्या. स्टीव्हनचं भारत विरुद्धचं एकूण नववं कसोटी शतक ठरलं.
सिराजने ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं
Mohd. Siraj wraps up the innings by picking the final two wickets ?
Australia all out for 469 in the first innings.
Scorecard – https://t.co/0nYl21pwaw…#TeamIndia | #WTC23 | @mdsirajofficial pic.twitter.com/QUjNXEv6GH
— BCCI (@BCCI) June 8, 2023
या दोघांव्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकाही फलंदाजाला मोठी खेळी करुन दिली नाही. एलेक्स कॅरी याने 48, डेव्हिड वॉर्नर याने 43 तर मार्नस लाबुशेन याने 26 धावा जोडल्या. उस्मान ख्वाजा याला भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. तर स्कॉट बॉलंड 1 धावेवर नाबाद राहिला.
टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तर रविंद्र जडेजा याने 1 विकेटसह चांगली साथ दिली. तर अक्षर पटेल याने मिचेल स्टार्क याला रन आऊट केलं.
चौथ्या विकेटसाठी 285 धावांची भागीदारी
ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा डावा सावरण्यासह निर्णायक आणि विक्रमी भागीदारी केली. या भागीदारी दरम्यान दोघांनी आपली वैयक्तिक शतकंही पूर्ण केली. या दोघांनी ऑस्ट्रेलियाकडून चौथ्या विकेटसाठी 285 धावांची भागीदारी केली.
मोहम्मद सिराज याच्या 4 विकेट्स
दरम्यान टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने 28.3 ओव्हरमध्ये 108 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. सिराजने उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड, कॅप्टन पॅट कमिन्स आणि नेथन लायन या चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.