लंडन : गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, त्यावेळी माणसाचा स्वत:वरील ताबा सुटतो. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा याला अपवाद नाहीय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पहिल्या दिवसाच्या खेळात हेच दिसून आलं. पहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं. 85 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 327 धावा केल्या. ट्रेव्हिसने 156 बॉलमध्ये 22 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 146 धावा केल्या, तर स्टीव्हन स्मिथ शतकाच्या उंबरठ्यावर आहे.
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाची चौथी विकेट काढता आली नाही. त्यामुळे कॅप्टनच फ्रस्ट्रेशन वाढणं स्वाभाविक आहे. पण तोल सुटता कामा नये. रोहित शर्माच्या बाबतीत नेमकं हेच घडलं.
कधी घडली घटना?
कॅप्टन रोहित शर्मा रवींद्र जाडेजासाठी फिल्ड सेट करत होता. त्यावेळी सहकाऱ्याबद्दल रोहितच्या तोंडून अपशब्द निघाले. ‘क्या यार तूम लोग…..’ स्टम्पच्या माइकमध्ये रोहितच्या तोंडून निघालेले शब्द कैद झाले. दिवसाच्या शेवटच्या सत्रात ही घटना घडली. टीम इंडियाकडून ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांची पार्ट्नरशिप ब्रेक करण्याचा प्रयत्न सुरु होता.
‘
कोणी शेयर केला व्हिडिओ?
रोहितने रवींद्र जाडेजाच्या हाती चेंडू सोपवला. त्यावेळी फिल्ड सेट करताना मैदानावरील फिल्डर सूचनांचे पालन करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रोहित चिडल्याच दिसलं. एका चाहत्याने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेयर केलाय. सकाळच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी तीन विकेट काढले. त्यानंतरच्या सर्व सत्रात फक्त ऑस्ट्रेलियाच वर्चस्व होतं.
— No-No-Crix (@Hanji_CricDekho) June 7, 2023
टीम इंडियाच्या गोलंदाजांचा संघर्ष शेवटपर्यंत कायम होता. पहिली गोलंदाजी स्वीकारण्याचा रोहितचा निर्णय योग्य ठरला नाही. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर प्रभावी कामगिरी करु शकले नाहीत.