IPL 2022 मध्ये चांगली कामगिरी करुन टीम इंडियात स्थान मिळवणार; स्पर्धेआधी शिखर धवनचा निर्धार
यंदाची आयपीएल (IPL 2022) स्पर्धा अनेक अर्थांनी खास आहे. लिलावानंतर संघ नव्या अवतारात मैदानात उतरतील. यावेळी 8 नव्हे तर 10 संघ विजेतेपदासाठी दावा मांडणार आहेत. हे आयपीएल देखील खास आहे कारण या वर्षाच्या शेवटी टी-20 विश्वचषक स्पर्धा (ICC T20 World Cup) होणार आहे.
मुंबई : यंदाची आयपीएल (IPL 2022) स्पर्धा अनेक अर्थांनी खास आहे. लिलावानंतर संघ नव्या अवतारात मैदानात उतरतील. यावेळी 8 नव्हे तर 10 संघ विजेतेपदासाठी दावा मांडणार आहेत. हे आयपीएल देखील खास आहे कारण या वर्षाच्या शेवटी टी-20 विश्वचषक स्पर्धा (ICC T20 World Cup) होणार आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर विविध खेळाडूंना विश्वचषक संघाचा भाग बनण्याची मोठी संधी आहे. टीम इंडियाचा स्फोटक डावखुरा फलंदाज आणि सलामवीर शिखर धवनला (Shikhar Dhawan) याची जाणीव आहे आणि तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन टीम इंडियात आपले स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे.शिखर धवन गेल्या काही काळापासून टीम इंडियाचा नियमित खेळाडू नाही. अशा परिस्थितीत त्याला आयपीएलच्या माध्यमातून टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचे आहे.
आयपीएल 2021 मध्ये (गेल्या मोसमात) दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला धवन यावेळी पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. टीम इंडियाचा गब्बर याची आतुरतेने वाट पाहात आहे.
आयपीएल ही धवनसाठी मोठी संधी
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना धवनने सांगितले की, त्याला माहित आहे, आयपीएल ही त्याच्यासाठी मोठी संधी आहे. तो म्हणाला, टी-20 विश्वचषक आता येणार आहे. मला माहित आहे की मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर मी टीम इंडियाचा भाग होऊ शकतो. मी स्वतःसाठी ध्येय ठेवत नाही. मी माझ्या खेळाचा आनंद घेतो. मी माझ्या तंदुरुस्तीचा (फिटनेस) आणि खेळातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतो ज्यामुळे मला फायदा होतो. माझी तयारी मजबूत असेल तर मी सर्व काही करू शकतो. मला खात्री आहे की मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करेन. जर मी हे केले तर मी विश्वचषक संघाचा भाग होऊ शकतो. असं होईल किंवा कदाचि होणार नाही, पण ही गोष्ट येणारी वेळच ठरवेल. मात्र याचा मी माझ्यावर काहीही परिणाम होऊ देणार नाही.
पंजाब किंग्स हा घरचा संघ
पंजाब किंग्ज संघाचा भाग झाल्याबद्दल मला फार आनंद झाला. मी पंजाबी आहे त्यामुळे माझा या संघाशी खूप घट्ट संबंध आहे. दिल्लीप्रमाणेच पंजाबही माझे घर आहे. मला लहानपणापासून पंजाबी गाण्यांची खूप आवड आहे. पंजाबी कुटुंबातील असल्याने मी पंजाबीही बोलू शकतो, त्यामुळे चाहत्यांशी माझे वेगळे नाते आहे. संघासाठी आणि माझ्यासाठी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करण्याची संधी आहे. आमचा संघ संतुलित आहे.
इतर बातम्या
CSK IPL 2022: धोनीच बेस्ट फिनिशर का? शेवटच्या पाच षटकातील ‘या’ आकेडवारीवर नजर मारा म्हणजे समजेल