Ravichandran Ashwin: वर्ल्डकप संघात रविचंद्रन अश्विन याची एन्ट्री झाली तर प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार असा बदल, जाणून घ्या

Ravichandran Ashwin: वनडे वर्ल्डकपपूर्वी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत आर अश्विनला संधी मिळाली आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणार अशी चर्चा रंगू लागली आहे. जर संधी मिळाली तर प्लेइंग इलेव्हनचं गणित बदलणार आहे.

Ravichandran Ashwin: वर्ल्डकप संघात रविचंद्रन अश्विन याची एन्ट्री झाली तर प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार असा बदल, जाणून घ्या
Ravichandran Ashwin: रविचंद्रन अश्विन याला वनडे वर्ल्डकप संघात स्थान मिळालं तर अशी असेल प्लेइंग इलेव्हन, हा खेळाडू बसेल बेंचवर
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 8:56 PM

मुंबई : टीम इंडियाने आशिया कप 2023 वर नाव कोरल्यानंतर आता वनडे वर्ल्डकप जेतेपदावर नजर खिळली आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. दहा वर्षानंतर टीम इंडियाला आयसीसी चषक जिंकण्याची संधी आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करताना आर अश्विनची सरप्राईस एन्ट्री झाली आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. कारण याबाबतचे संकेत खुद्द कर्णधार रोहित शर्मा याने दिले आहेत. अक्षर पटेल दुखापतग्रस्त असल्याने आर अश्विनला संधी मिळेल असं बोललं जात आहे. अश्विनला वर्ल्डकप संघात स्थान मिळालं तर नक्कीच प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल. असं झालं अतक एका प्लेयरला बाहेर बसावं लागेल. चला जाणून घेऊयात आर अश्विनची निवड झाल्यास काय गणितं बदलतील ते..

वनडे वर्ल्डकप संघात आर अश्विन असेल?

आशिया कप जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं होतं की, आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघंही वर्ल्डकप प्लानमध्ये आहेत. त्यांची भूमिका निश्चित होऊ शकते. अश्विनसोबत फोनवरून टचमध्ये असल्याचं सांगितलं आहे. या वक्तव्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडलेल्या संघात आर अश्विनची निवड झाली आहे.

अक्षर पटेल याला दुखापत झाली असल्याने तो बरा होण्याची वाट पाहिली जात आहे. पण वर्ल्डकपपूर्वी बरा झाला नाही, तर मात्र अश्विनच्या नावावर शिक्कोमोर्तब होऊ शकते. वर्ल्डकप संघात एकही ऑफ स्पिनर नाही. त्यामुळे अश्विनला संधी मिळू शकते. तसेच फलंदाजीतही तो बेस्ट आहे. पण संघात कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे देखील आहेत. त्यामुळे प्लेइंग इलेव्हन निवडताना डोकेदुखी वाढणार आहे. निवड टीम कॉम्बिनेशन आणि पिचवर अवलंबून असेल.

आर अश्विन याची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली तर एका खेळाडूला बेंचवर बसावं लागणार आहे. तीन स्पिनर्स घेऊन खेळणं कठीण आहे. अशात 3 वेगवान गोलंदाज आणि 2 स्पिनर्स मैदानात असतील. हार्दिक पांड्या गोलंदाजी करत असल्याने एक वेगवान गोलंदाजाची उणीव भरून काढेल. त्यामुळे दोन वेगवान गोलंदाजांचा विचार केल्यास हार्दिक पांड्या किंवा शार्दुल ठाकुर किंवा रविचंद्रन अश्विन यापैकी एकाची निवड करावी लागेल.

प्लेइंग-11 पहिला फॉर्म्युला: रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन/रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

प्लेइंग-11 दुसरा फॉर्म्युला: रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर/रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह

वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.