INDvsAUS | टीम इंडिया चौथ्या कसोटीतील पराभवानंतरही अशी पोहचेल Wtc Final मध्ये

टीम इंडियाचं याआधी 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं.

INDvsAUS | टीम इंडिया चौथ्या कसोटीतील पराभवानंतरही अशी पोहचेल Wtc Final मध्ये
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 7:42 PM

मुंबई | इंदूर कसोटीत पराभव झाल्याने टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा मार्ग काहीसा कठीण असा झाला आहे. त्यामुळे WTC Final मध्ये पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा चौथा आणि शेवटचा सामना टीम इंडियाला जिंकायचा आहे. मात्र टीम इंडियाचा चौथा सामन्यात पराभव झाला तर काय, असा सवाल चाहत्यांना पडला आहे. टीम इंडियाचा पराभव झाला तरी टीम इंडिया अंतिम फेरीत प्रवेश करु शकते, हो हे शक्य आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानी आहे. टीम इंडियाचे 123 पॉइंट्स आणि विजयी टक्केवारी ही 60.29 टक्के इतकी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा 148 पॉइंट्ससह अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाची विजयी आकडेवारी 68.52 आहे. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंका आहे. कोलकाताकडे 64 पॉइंट्स आणि 53.33 टक्केवारी आहे.

पराभवानंतरही टीम इंडिया फायनलमध्ये!

ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम फेरीतील दुसऱ्या जागेसाठी टीम इंडिया आणि श्रीलंकेत काँटे की टक्कर आहे. मात्र टीम इंडियाची फायनलमध्ये पोहण्याची शक्यता अधिक आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा चौथा कसोटी सामना गमावला तरीही फायनलमध्ये पोहचू शकते. मात्र त्यासाठी दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना हा अनिर्णित रहायला हवा.

असं आहे जर-तरचं समीकरण

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात 8 मार्चपासून होत आहे. श्रीलंकेला फायनलमध्ये पोहचायचं असेल, तर त्यांना न्यूझीलंडचा दोन्ही सामन्यात पराभव करावा लागेल, जे शक्य नाही.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकही सामना अनिर्णित राहिला, तर श्रीलंका फायनलच्या स्पर्धेतून बाहेर फेकली जाईल. तर टीम इंडियाची एन्ट्री होईल. अशाप्रकारे 7 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात गदासाठी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडतील.

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया

टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.

टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.