3 ओव्हरमध्येच खेळ खल्लास, स्कोअरकार्ड पाहून शॉक व्हाल
केनिया आणि कॅमरुन यांच्यातील सामन्यात एक वेगळीच गोष्ट पहायला मिळाली. यावेळी तीन ओव्हरमध्ये सामना जिंकल्याचं पहायला मिळालं. विशेष म्हणजे हे चौथ्यांदा होतंय. यापूर्वी कधी झालं, जाणून घ्या..
नवी दिल्ली : आता एका अशा मॅचबद्दल (Match) आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यानं अवघ्या क्रिकेटविश्वाचं (Cricket) लक्ष्य वेधलं आहे. ही मॅच केनिया आणि कॅमरुन (Kenya vs Cameroon) यांच्यात झाली. या मॅचनं अवघ्या क्रिकेटविश्वाला शॉक केलं. विलोमूर पार्क, बेनोनीनं याठिकाणी झालेल्या या मॅचमध्ये कॅमरुन हा संघ नऊ विकेटनं पराभूत झाला. दरम्यान, यावेळी एक अनोखी गोष्ट पहायला मिळाली. यावेळी तीन विकेट आणि खेळ खल्लास असं चित्र पहायला मिळालं. याचा देखील इतिहास आहे. असं यापूर्वी कधी झालं, हे आणि याविषयी अधिक जाणून घ्या…
पहिले कॅमरुनची फलंदाजी
कॅमरुननं आधी फलंदाजी करताना 14.2 ओव्हरमध्ये दहा विकेटच्या नुकसानासह 48 धावा काढल्या. केनियासाठी यश तालातीनं आठ धावा काढून तीन विकेट घेतले. तर शेम नोचनं दहा धावा काढून तीन विकेट घेतले. लुकासनं दोन आणि गेरार्डनं एक विकेट घेतली. पण, तरीही तुम्हाला तीन ओव्हरची गंमत कळाली नसेल. तेच आम्ही तुम्हाल सांगणार आहोत.
3.2 ओव्हरमध्ये खेळ खल्लास
49 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना केनियाच्या संघानं 3.2 ओव्हरमध्ये एक विकेटच्या नुकसान सहन करून 50 धावा काढल्या. ऋशभ पटेलनं 14 धावा केल्या. सुखदीप सिंहनं दहा चेंडूत नाबाद 26 आणि नेहेमिआहनं नाबाद सात धावा काढल्या. अशा प्रकारे केनियानं 3.2 ओव्हरमध्ये विजय आपल्या नावावर केलाय.
असं चौथ्यांदा झालं
तुम्हाला हे माहिता आहे का, हा वरील प्रकार चौथ्यांदा झालाय. सगळ्यात जास्त चेंडू शिल्लक राहून विजय मिळवलेलं हे चौथं प्रकरण आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. यांनी 2019मध्ये तुर्कीविरुद्ध 104 चेंडू बाकी ठेवून दहा विकेटनं विजय मिळवला होता. दुसऱ्या नंबरवर ओमान आहे. यांनी फिलीपींसविरुद्ध 103 चेंडू बाकी ठेवत नऊ विकेटनं सामना जिंकला होता.