M S Dhoni : महेंद्रसिंह धोनीची सर्वात मोठी घोषणा, फेसबूकवर पोस्ट करत म्हणाला…

M S Dhoni Facebook Post : महेंद्रसिंह धोनीने सोशल मीडियाद्वारे आपल्या नव्या निर्णयाबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. धोनीने फेसबूक पोस्टद्वारे मोठी घोषणा केली आहे.

M S Dhoni : महेंद्रसिंह धोनीची सर्वात मोठी घोषणा, फेसबूकवर पोस्ट करत म्हणाला...
m s dhoni cskImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 1:14 PM

चेन्नई सुपर किंग्सचं आयपीएलच्या 17 व्या मोसमातून पॅकअप झालं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सवर आवश्यक फरकाने मात करत 14 गुणांसह प्लेऑफमधील चौथं स्थान पटकावलं. तर पराभवामुळे चेन्नईचं प्लेऑफचं स्वप्न अधुरं राहिलं. त्यानंतर आता प्लेऑफ सामन्यांना सुरुवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी 21 मे रोजी सनरायजर्स हैदराबादवर मात करत फायनलमध्ये धडक मारली. त्यानंतर आज 22 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नईचा विकेटकीपर बॅट्समन महेंद्रसिंह धोनी याने फेसबूक पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे.

महेंद्रसिंह धोनीने फेसबूकवर 3 वाक्यांची पोस्ट केली आहे. धोनीने या पोस्टमधून मोठी घोषणा केली आहे. “झेप घेण्याची वेळ आहे. जे महत्त्वाचे आहे ते करण्याची वेळ आली आहे. मी माझी स्वत:ची टीम सुरु करत आहे!” असं महेंद्रसिंह धोनीने फेसबूक पोस्टमध्ये म्हटलंय. आता धोनीची नवी टीम कोणती असणार? ती टीम क्रिकेट संबंधित असणार की आणखी काही? याबाबतची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आणि धोनीच्या फॉलोवर्सला आहे.

आयपीएलमध्ये धोनीची स्वत:ची टीम?

धोनीने याआधी घेतलेले अनेक निर्णय हे आश्चर्यकारक राहिले आहेत. धोनीने निवृत्तीचा निर्णयही कुणाला ध्यानी मनी नसताना घेतला होता. तसेच धोनीच्या कोणत्याही सोशल मीडिया पोस्टचा निर्णय जशाच्या तसा घेणंही चुकीच ठरेल, कारण धोनी अशा पोस्टमधून जाहिरातीबाबतही प्रमोशन करत असतो. धोनीने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये मी माझी स्वत:ची टीम सुरु करत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे ही टीम क्रिकेट संबंधित असून धोनी आयपीएलमध्ये टीम घेणार आहे का? अशी चर्चा रंगली आहे. तर दुसऱ्या बाजूला धोनी स्वत:चं आणखी काही सुरु करुन तिथे आपली टीम आणणार असावा, अशीही चर्चा आहे.

महेंद्रसिंह धोनीची फेसबूक पोस्ट

आता धोनीची नवी टीम कोणती असणार? धोनीच्या टीमचा कॅप्टन तो स्वत:च असणार की आणखी कुणी? याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून आहे. धोनीच्या पुढीच्या भूमिकेची माहिती ही त्याच्या सोशल मीडियावरुनच मिळेल. त्यामुळे धोनीच्या या पोस्टमधील नवीन टीम याचा अर्थ हा येत्या काही दिवसात लवकरच स्पष्ट होईल, अशी आशा धोनी चाहत्यांना आहे. त्यामुळे धोनीच्या सोशल मीडिया अकाउंवरही सर्वांची करडी नजर असणार आहे.

सीएसकेची कामगिरी

दरम्यान महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी कर्णधारपदाची जबाबदारीतून मुक्त होत पुणेकर ऋतुराज गायकवाडला सूत्रं दिली. ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईने 14 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर 7 वेळा पराभवाचा सामना करावा लागला.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.