बीसीसीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, आयपीएलपूर्वी या स्पर्धेतून इम्पॅक्ट प्लेयर नियम संपुष्टात

गेल्या काही दिवसांपासून इम्पॅक्ट प्लेयर नियमाची जोरदार चर्चा रंगली आहे. या नियमाला रोहित-विराटसह दिग्गज खेळाडूंनी विरोध केला आहे. असं असताना बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेयरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. हा नियम जेथून सुरु झाला होता त्या स्पर्धेतून हटवण्यात आला आहे.

बीसीसीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, आयपीएलपूर्वी या स्पर्धेतून इम्पॅक्ट प्लेयर नियम संपुष्टात
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 5:24 PM

आयपीएलची दोन पर्व इम्पॅक्ट प्लेयर नियमाने गाजवली. इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे सामन्याचं संपूर्ण चित्रच पालटून गेल्याचं पाहायला मिळालं. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये बीसीसीआयने हा नियम लागू केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर हा नियम नाही. त्यामुळे या नियमामुळे बराच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरी हा इम्पॅक्ट प्लेयर नियम आयपीएलच्या या पर्वात कायम असणार आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धेतून हा नियम हद्दपार केला आहे. ज्या स्पर्धेतून बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेयर नियम सुरु केला होता, तेथून बाद करण्यात आला आहे. बीसीसीआयने सर्वात आधी इम्पॅक्ट प्लेयरची अंमलबजावणी सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून केली होती. आता या स्पर्धेतून हा नियम दूर करण्यात आला आहे. सैय्यद मुश्ताक अली स्पर्धा 23 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ही स्पर्धा 15 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. बीसीसीआयने राज्य संघाला दिलेल्या एका निवेदनातून इम्पॅक्ट प्लेयर नियम रद्द केल्याच्या निर्णयाची पुष्टी झाली आहे.

बीसीसीआयने सांगितलं की, ‘कृपया लक्ष द्या, बीसीसीआयने या पर्वापासून इम्पॅक्ट प्लेयर नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘त्यामुळे सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत हा नियम नसेल हे स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे बीसीसीआयने नुकतंच आयपीएल फ्रेंचायझींना सूचना दिली होती की, आयपीएलच्या आगामी पर्वासाठी इम्पॅक्ट प्लेयर नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये 2023 मध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियमाची एन्ट्री झाली होती. या नियमानुसार फ्रेंचायझी प्लेइंग 11 मधून एकाला बाहेर काढून दुसऱ्या खेळाडूला समाविष्ट करू शकते. म्हणजेच संघात 12 खेळाडूंचा वापर केला जाऊ शकतो.

इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार,नाणेफेकीनंतर दोन्ही संघांना आपल्या प्लेइंग इलेव्हन व्यतिरिक्त इम्पॅक्ट प्लेयर्सची नावं देणं आवश्यक असतं. यापैकी एका खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर केला जातो. हा खेळाडू सामन्यात कोणत्याही वेळी प्लेइंग 11 मध्ये कोणत्याही खेळाडूची जागा घेऊ शकतो. दरम्यान, मागच्या दोन पर्वात आयपीएलमध्ये हायस्कोरिंग सामने पाहायला मिळाले होते. यामुळे अष्टपैलू खेळाडू प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं. कारण सामन्यात संघ फलंदाज आणि गोलंदाज यांनाच प्राधान्य देतात.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर, कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर, कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?.
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली.
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'.
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा.
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या.
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा.
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत.
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ.
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ.