IND vs SL सामन्यात वानखेडेमध्ये बॅनरवर बंदी, पोलिसांनी अचानक का दिल्या सूचना

IND vs SL World Cup 2023 : भारत-श्रीलंका सामन्याआधी मुंबई पोलिसांनी सर्व क्रिकेट चाहत्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. इतकंच नाहीतर स्टेडियममध्ये येताना काही वस्तूंवर बंदीही घातली आहे. नेमकी कोणत्या ते जाणून घ्या.

IND vs SL सामन्यात वानखेडेमध्ये बॅनरवर बंदी, पोलिसांनी अचानक का दिल्या सूचना
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 12:46 PM

मुंबई : आज वर्ल्ड कपमधील 33 वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुपारी दोन वाजता सामना सुरू होईल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ अजून अपराजित आहे. भारताने सलग सहा सामने जिंकले असून आता सातव्या विजयासाठी रोहितसेना सज्ज असणार आहे. वर्ल्ड कपचा सामना मुंबईतील वानखेडेवर होणार असल्याने मुंबई पोलिसांनी सर्व क्रिकेट प्रेक्षकांना काही सूचना दिल्या आहेत.

पोलिसांच्या सर्व क्रिकेट चाहत्यांना सूचना-

सुरक्षा तपासणीमुळे शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लवकर स्टेडियममध्ये वेळेआधी पोहोचावं. दुपारी दोन वाजेपासून सुरू होणाऱ्या सामनासाठी प्रेक्षकांना दुपारी 11.30 वाजेपासूनच मैदानात प्रवेश देण्यात येणार आहे. आक्षेपार्ह बॅनर, लायटर, ज्वलनशील पदार्थ आणण्यासाठी मनाही आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रेक्षकांनी लोकल ट्रेनचा वापर कराव कारण पार्किंगची कुठलीही सोय उपलब्ध नाही. पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल केला असून त्यामध्ये एसपी डॉ. प्रवीण मुंडे सूचनांबाबत माहिती देत आहेत.

राज्यात मराठा आरक्षणचा मुद्दा पेटत चालला आहे. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि रस्ते जाम करण्यात येत आहे. दिवसेंदिवस हा विषय आणखीणच वाढत चालल्याचं दिसत आहे. आजच्या सामन्यामध्ये बॅनरबाजी करत मराठा आंदोलकांना काही केलं तर मोठा गोंधळ उडू शकतो. राज्यातही वातावरण गरम असल्याने पोलिसांनी आक्षेपार्ह बॅनरबाजी करण्याला मनाई केली असावी. पोलिसांनी सूचना असा काही उल्लेख केला नाही पण अचानक असा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मरिन ड्राईव्ह जवळच असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. खबरदार म्हणून मुंबई पोलिसांना या सूचना दिल्या आहेत. सुरक्षा व्यवस्थेचा फायदा घेऊन कोणी काही घातपात करण्याचा प्रयत्न करू नये याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आधीच सर्वांना सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, वानखेडे स्टेडियमवर कालच म्हणजेच मंगळवारी १ नोव्हेंबरला सचिन तेंडुलकर याच्या पुतळ्याचं अनावरण झालं. नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी म्हणून सचिनचा पुतळा बसवण्यात आला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीसीसीआय सचिव जय शहा, आयसीसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि आदी मान्यवर उपस्थि होते.

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC.), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.